World Book Day 2024  esakal
लाइफस्टाइल

World Book Day 2024 : जगातलं सर्वात पहिलं छापील पुस्तक कोणतं आहे?

हे पुस्तक इतर हजारो हस्तलिखिते आणि दस्तऐवजांसह असलेल्या खोलीत सापडले

सकाळ डिजिटल टीम

World Book Day 2024 : 

जगभरातल्या लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच, लेखकांचा सन्मान व्हावा यासाठी २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. लहानपणापासून अनेक मुलांना वाचनाची आवड असते. ती आवड शाळेतील लायब्ररीत जाऊन अधिक वाढते.

आजवर आपण अनेक पुस्तके पाहिली आहेत. लोकांच्या घरी मोठ्या मोठ्या लायब्ररीही असतात. आपल्या आयुष्यात पुस्तकांना महत्त्वाचे स्थान आहे. आजवर अनेक पुस्तके आपण पाहिली असतील. पण, जगातले पहिले पुस्तक कोणते होते याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

तर,जगातील पहिले पुस्तक डायमंड सूत्र हे मानले जाते. चीनमध्ये छपाई तंत्रज्ञानाच्या विकासानंतर हे पुस्तक इसवी सन ८६८ मध्ये छापण्यात आल्याचे सांगितले जाते. हे बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांमधील संवाद स्पष्ट करते. 

हे पुस्तक 1900 मध्ये मोगाव लेण्यांमध्ये सापडल्याचे सांगितले जाते. ज्याला चीनच्या डुनहुआंग जवळ हजार बौद्ध लेणी म्हणूनही ओळखले जाते. हे पुस्तक इतर हजारो हस्तलिखिते आणि दस्तऐवजांसह असलेल्या खोलीत सापडले.

डायमंड सूत्र हा एक महत्त्वाचा बौद्ध धर्मग्रंथ मानला जातो. या पुस्तकाची मूळ प्रत लंडनमधील ब्रिटिश लायब्ररीमध्ये ठेवण्यात आली आहे. वुडब्लॉक तंत्राचा वापर करून ते छापण्यात आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वुडब्लॉक तंत्र म्हणजे काय?

यामध्ये पुस्तक छपाईसाठी लाकडी ठोकळ्यांचा वापर केला जायचा. ठोकळ्यांवर अक्षरे आणि प्रतिमा कोरणे, त्यांना शाई लावणे आणि नंतर कागदावर दाबले जायचे. या पद्धतीचा वापर करून डायमंड सूत्र छापण्यात आले. हे पुस्तक चिनी भाषेत सिद्धम लिपी वापरून लिहिलेले आहे. ज्याचा उपयोग त्याकाळी बौद्ध ग्रंथांसाठी केला जात असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT