World Health Day 2024 Sakal
लाइफस्टाइल

World Health Day 2024: निरोगी राहण्यासाठी 'या' 10 योगासनाने करू शकता दिवसाची सुरूवात

दरवर्षी जगभरात लोकांच्या सामान्य आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

Puja Bonkile

world health day 2024 to stay your fitness with these yoga tips

दरवर्षी जगभरात लोकांच्या सामान्य आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी ७ एप्रिल हा दिवसजागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. शारिरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तंदुरूस्त असणे गरजेचे असते. तुम्ही निरोगी असाल तरच आयुष्यात सुखी राहू शकते. तसेच करिअरमध्ये यश मिळवू शकता.

निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी योग करणे गरजेचे असते. यामुळे शारिरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहते. नियमितपणे रोज सकाळी योग केल्याने तणाव, चिंता आणि नैराश्य दूर होते. तसेच झोपेची समस्या देखील कमी होते.

  • बालासन

बालासन करणे आरोग्यदायी मानले जाते. हा योग केल्याने तणाव कमी होतो. पोटावरील चरबी कमी होते आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

  • भुजंगासन

भुजंगासन नियमितपणे केल्याने कंबरेशी संबंधित समस्या दूर होतात. पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक होतो.

  • नटराज

नटराज योग करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही तज्ञाची गरज नाही. हे आसन वरच्या ते खालच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.

  • गोमुखासन

गोमुखासनाच्या सरावाने शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागात जडपणा दूर होतो. हा योग नियमितपणे करावा.

  • त्रिकोनासन

कंबरेवर जमा झालेल्या चरबीसह पाय मजबूत करण्यासाठी दररोज त्रिकोनासनाचा सराव करावा. यामुळे शरीरही लवचिक बनते.

  • उष्टासन

पोटाची चरबी कमी करण्यासाठी उष्टासन हे सर्वात फायदेशीर योग आहे. याशिवाय हा योग केल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.

  • वज्रासन

​जेवल्यानंतर वज्रासन करावे. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. पाठ आणि कंबरदुखीच्या समस्येवरही हे फायदेशीर आहे.

  • ताडासन

ताडासनाचा सराव केल्याने संपूर्ण शरीर ताणले जाते. हा योग शरीर संतुलित आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT