World Laughter Day 2024 esakal
लाइफस्टाइल

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

मनसोक्त हसणे केवळ तुमचा मूड सुधारत नाही तर ते थेरपी म्हणून देखील कार्य करते

सकाळ डिजिटल टीम

 World Laughter Day 2024 :

आजकालचे लोक रोजच्या आयुष्यात इतके व्यस्त झाले आहेत की,ते शेवटचे कधी हसले होते हे त्यांना आठवतही नाही. आजकाल मित्रमंडळींच्या भेटीगाठी कमी झाल्याने मनसोक्त हसणं कमी झालं आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा कमी झाल्यात त्यामुळे लोक हसणे विसरले आहे.     

इतकी वाईट वेळ आलीय की, लोकांना मोठ-मोठ्याने हसण्याचा व्यायाम करावा लागत आहे.  कारण आपल्या दिवसभराच्या कामात आपण कितीवेळ हसलो यावर आपले निरोगी असणे अवलंबून आहे. मनसोक्त हसणे केवळ तुमचा मूड सुधारत नाही तर ते थेरपी म्हणून देखील कार्य करते.

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जर तुम्ही मोकळेपणाने हसलात तर तुम्ही अनेक आजारांना स्वतःपासून दूर ठेवू शकता. आज रोजी जागतिक हास्य दिन (World Laughter Day 2024) साजरा केला जातो. या निमित्तानेच आयुष्यात मोकळेपणाने हसणे का महत्त्वाचे आहे. त्याचे आपल्या आरोग्याला काय फायदे आहेत याबद्दल जाणून घेऊयात.

तणावमूक्त व्हाल

मनमोकळेपणाने हसणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. जर तुम्ही दररोज काही वेळ मनापासून हसत असाल तर ते एंडोर्फिन हार्मोन्स सोडते आणि तुमचा तणाव कमी करते. डिप्रेशनची समस्या टाळते. मूड स्विंग, चिडचिड, नकारात्मकता संपते.

हृदय विकाराच्या आजारापासून होतो बचाव

तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता विकसित होते आणि तुम्हाला बीपी आणि हृदयाच्या समस्यांपासून बचाव होतो आणि हसणे हे बीपी रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण, तणाव हा उच्च रक्तदाबासाठी एक प्रमुख जोखीम घटक मानला जातो.

उच्च रक्तदाब हा हृदयविकाराचा मोठा धोका घटक मानला जातो. हसल्याने तुमचा मूड सुधारतो, तणाव कमी होतो आणि त्यामुळे बीपी आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही कमी होतो.

शांत झोपेसाठी

जे लोक मोकळेपणाने हसतात त्यांच्या शरीरात मेलाटोनिन नावाचा हार्मोन पुरेशा प्रमाणात तयार होतो. अशा परिस्थितीत त्यांना चांगली झोप लागते. चांगली झोप शरीराला बरे करण्याचे काम करते.

चिरंतन तरूण राहण्यासाठी 

मनसोक्त हसण्याने ऑक्सिजनचा प्रवाह चांगला होतो आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह चांगला होतो. यामुळे तुमच्या फुफ्फुसांचे, हृदयाचे आणि मेंदूचे आरोग्य तर सुधारतेच, शिवाय ते शरीराला सक्रिय आणि ताजेतवाने ठेवते. जे लोक मोकळेपणाने हसतात ते दीर्घकाळ तरुण राहतात.

हसरे लोक सकारात्मक असतात

जे लोक स्वत: हसरे असतात. ते इतरांनाही खूश ठेवण्याचा, हसवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांमध्ये सकारात्मक उर्जा असते. जी त्या लोकांना आणि त्यांच्या सभोवती असलेल्या लोकांमध्ये सकारात्मकता पसरवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT