World Ocean Day 2024 esakal
लाइफस्टाइल

World Ocean Day 2024 : तुम्हाला माहितीय का जगात किती महासागर आहेत?

जागतिक महासागर दिवस दरवर्षी ८ जून रोजी साजरा केला जातो

सकाळ डिजिटल टीम

World Ocean Day 2024 :

तुम्हाला माहिती आहेच की, पृथ्वीचा ७० टक्क्यांहून अधिक भाग महासागरांनी व्यापलेला आहे. महासागर अनेक आवश्यक संसाधने प्रदान करतात. महासागर हा अन्नाचा प्रमुख स्त्रोत आणि जीवमंडलाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.

जागतिक महासागर दिवस दरवर्षी ८ जून रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश महासागरांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या संवर्धनाबद्दल जागरुकता वाढवणे हा आहे. जगात महासागराचे महत्त्व मोठे आहे.

२००८ सालापासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या साजरा करण्याचे ठरवले. २००८ मध्ये या दिनाची पहिली थीम ही आपल्या महासागराला मदत करणे अशी होती. त्यापूर्वी १९८२ सालापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे.

कॅनडा स्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे, या संस्थेच्या पुढाकाराने सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात करण्यात आली.

जगात एकूण पाच महासागर आहेत. प्रत्येक महासागराचे स्वतःचे वेगळे स्थान आणि महत्त्व आहे.  पण, जगात किती महासागर आहेत हे तुम्हाला माहिती आहेत का? आज जागतिक महासागर दनी आपण याबद्दल माहिती घेणार आहोत.

पॅसिफिक महासागर

पॅसिफिक महासागर आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यामध्ये स्थित आहे. पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे, जो अंदाजे ६३ दशलक्ष चौरस मैल क्षेत्र व्यापलेला आहे.

अटलांटिक महासागर

उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिका यांच्यामध्ये स्थित आहे. हा जगातील दुसरा सर्वात मोठा महासागर आहे. ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे १०६ चौरस किलोमीटर आहे.

हिंदी / भारतीय महासागर

हा महासागर आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि हिंद महासागर बेटांच्या दरम्यान स्थित जगातील तिसरा सर्वात मोठा महासागर आहे. त्याचे क्षेत्रफळ अंदाजे ७० दशलक्ष चौरस किलोमीटर आहे.

दक्षिणी महासागर

या महासागराला २००० मध्ये आंतरराष्ट्रीय हायड्रोग्राफिक संघटनेने अधिकृतपणे मान्यता दिली. हा महासागर अंटार्क्टिकाभोवती स्थित आहे, ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे २०.८ दशलक्ष चौरस किलोमीटर आहे.

आर्क्टिक महासागर

जगातील पाच महासागरांपैकी सर्वात लहान म्हणजे आर्क्टिक महासागर, जो उत्तर ध्रुवाभोवती आर्क्टिक प्रदेशात स्थित आहे आणि उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियाने वेढलेला आहे. या महासागराचे क्षेत्रफळ अंदाजे १४ दशलक्ष चौरस किलोमीटर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT