World Parents Day esakal
लाइफस्टाइल

World Parents Day : पालकांनो, मुलांना फक्त अभ्यासू किडा बनवू नका, तर 'या' गोष्टीही शिकवा

मुलांच यश फक्त अभ्यासात नाही तर सर्वांगीण विकासात आहे.

धनश्री भावसार-बगाडे

All round Development Is Important For Success : भविष्यात चांगली नोकरी, पगार, फॉरेन टूर या सगळ्यासाठी उच्च शिक्षण आणि चांगले गुण आवश्यक असतात... असाच एक समज सर्वत्र पसरलेला दिसतो. त्यामुळे पालकांचा सर्व भर हा मुलांच्या अभ्यासाकडे असतो. दिवसात किती तास मुलांनी अभ्यास करावा हे वेळापत्रकही पालकच ठरवतात. पण मुलांना फक्त अभ्यासू किडा बनवल्याने ते आयुष्यात यशस्वी होऊ शकतात का?

तर तज्ज्ञ या प्रश्नाचं उत्तर नकारात्मक देतात. मुलांना यशस्वी बनवण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होणं आवश्यक असतं. तो कसा ते जाणून घेऊया.

पूर्ण झोप - हल्ली पालकांच्या कामाच्या शेड्युलमुळे म्हणा किंवा टीव्ही, फोन बघत राहण्याने मुलांनाही उशीरा झोपण्याची सवय लागली आहे. पण सकाळी वेळेत शाळा, कॉलेज असल्याने लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे मुलांची एकाग्रता कमी होते. त्यासाठी पहिले चांगली झोप घ्यायला हवी. त्यामुळे मुलांची किमान ८-९ तास झोप होत आहे का याकडे लक्ष द्यावे.

व्यायम, योग, ध्यान - दिवसभराच्या धावपळीला सुरूवात होण्याआधी मुलांना सकाळी उठल्यावर व्यायाम, योग, ध्यान करण्याची सवय लावयला हवी. तरच त्यांच्यात एक स्थैर्य अनुभवायला मिळेल. जे त्यांच्या प्रगतीसाठी पोषक ठरेल.

पुस्तक वाचन - हल्ली मुलांचा स्क्रिन टाइम खूप वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या एकाग्रतेवर त्याचा वाइट परीणाम दिसून येत आहे. पण या ऐवजी मुलांना वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला शिकवली तर त्यांच्या ज्ञानात आणि एकाग्रतेत भर पडेल. मुलांना शक्य तेवढे स्क्रिन अॅडिक्शन पासून दूर ठेवावे.

चांगले मित्र - मुलांवर त्यांच्या मित्र परीवाराचा फार प्रभाव असतो. त्यामुळे जशी मुलांना वाईट संगत तर नाही यासाठी पालकांनी जागरुक राहणं आवश्यक असतं, तसंच मुलांना चांगली संगत मिळाली तर ते त्यांच्या आयुष्यासाठी चांगलं वळण देणारंही ठरतं. असे मित्र कसे ओळखावे, काय शिकावे याविषयी पालकांनी ज्ञान देणं आवश्यक असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Deputy Chief Minister Ajit Pawar: राहुल गांधींच्या आरोपात तथ्य नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार; 'हरल्यावरच ईव्हीएमची आठवण येते, जिंकल्यावर नाही'

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर, ४०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT