Yawning & Health  esakal
लाइफस्टाइल

Yawning & Health : सतत येणाऱ्या जांभईकडे दुर्लक्ष करणं महागात पडेल; वेळीच ओळखा हे आजार

...तर तुम्हाला स्लीप एपनिया होऊ शकतो

Pooja Karande-Kadam

Yawning & Health : एखाद्या Conference Meeting मध्ये कलिगला सतत येणारी जांभई सगळ्यांनाच डिस्टर्ब करत असते. त्याला पाहून प्रेझेंटेशन देणाऱ्या व्यक्तीलाही जांभई येते आणि पुर्ण मिटींगचीच वाट लागते. जांभई येणे हे थकल्यासारखे किंवा कंटाळवाणे वाटण्याचे एक सामान्य लक्षण आहे. (Yawning)

साउथ कॅरोलिना मेडिकल युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या मते, जांभई काही हार्मोन्समुळे होते ज्यामुळे Heartbeat वाढते. म्हणूनच तुम्ही थकलेले असाल तेव्हा तुम्हाला सावध करण्यासाठी जांभई दिली जाते. परंतु काही आरोग्य तज्ञांच्या मते, जर एखाद्याला जास्त जांभई आली 15 मिनिटांत 3 वेळा जास्त तर ते सामान्य मानलं जात नाही. (Yawning Health Concerns : Yawning throughout the day These can be signs of physical problems)

जास्त जांभई येणे हे एखाद्या आजाराचे किंवा आरोग्याच्या स्थितीचे लक्षण असू शकते. जर एखाद्याला सतत जांभई येत असेल तर त्याला काही समस्या असू शकतात. स्लीप एपनिया किंवा निद्रानाश तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर एखाद्याला जास्त जांभई आली तर झोपेची कमतरता हे त्यामागील सर्वात सामान्य कारण असू शकते.(Health Tips)

काही प्रकरणांमध्ये ते स्लीप एपनिया किंवा निद्रानाशाचे कारण देखील असू शकते. स्लीप एपनिया हा झोपेचा संभाव्य गंभीर विकार आहे. ज्यामध्ये श्वासोच्छ्वास वारंवार थांबतो आणि थोड्या वेळाने पुन्हा सुरू होतो. मेयो क्लिनिकच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही जोरात घोरत असाल आणि पूर्ण रात्र झोपल्यानंतरही थकवा जाणवत असाल तर तुम्हाला स्लीप एपनिया होऊ शकतो.

यूएसमधील नॅशनल हेल्थ डिपार्टमेंटच्या संशोधकांच्या मते, निद्रानाशामुळे तुम्हाला झोप न लागणे,  आळस असतो पण तरी झोप येत नाही. तसेच, चांगल्या दर्जाची झोप घेण्यास त्रास होऊ शकतो. तुमच्याकडे झोपण्यासाठी योग्य वातावरण आणि खोली असली तरीही हे होऊ शकते. (Insomnia)

औषधे

कोणी जास्त औषधे घेत असले तरी त्याला जास्त जांभई येऊ शकते. काही अँटीसायकोटिक्स किंवा अँटीडिप्रेसंट्सचे दुष्परिणाम जांभईच्या स्वरूपात देखील प्रकट होऊ शकतात. त्यामुळे, तुम्ही अशी कोणतीही औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय घेत नसल्यास आणि नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मेंदूचा विकार

जास्त जांभई येणे हे देखील मेंदूच्या विकाराचे लक्षण असू शकते. पार्किन्सन रोग, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि मायग्रेन डोकेदुखी यांसारख्या परिस्थितींमुळे देखील जास्त जांभई येऊ शकते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, एका संशोधनानुसार, सतत जांभई येणे हे ब्रेन ट्युमरचेही लक्षण आहे.

असे संकेत मिळत असतील तर तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एपिलेप्सी, हृदयविकाराचा झटका, हृदयाशी संबंधित त्रास, शरीराचे तापमान योग्य नसणे यामुळे जांभईचा त्रास उद्भवू शकतो. (Mental Health)

तणाव

आरोग्य तज्ञांच्या मते, जास्त जांभई येणे ही चिंता किंवा तणावामुळे देखील होऊ शकते. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे कारण कालांतराने चिंता किंवा तणाव ही समस्या बनू शकते. जास्त जांभई देखील येऊ शकते. पण जर एखाद्याला जास्त जांभई आली तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला हृदयविकाराचा झटका येईल यामध्ये घाबरण्याची गरज नाही.

खराब लिव्हर

तज्ज्ञांच्या मते हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारामुळे अथवा फुफ्फुसाचे कार्य नीट होत नसल्यास जांभई येण्याचे प्रमाण अधिक वाढते आणि तुम्हाला याबाबत अजिबात कळत नाही. जांभईच आहे असं म्हणून अनेक वेळा याकडे दुर्लक्ष होते. मात्र यामुळे तुम्हाला दम्याचा त्रासही होऊ शकतो हे लक्षात घ्या.


मधुमेह

मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे जांभई येणे. जेव्हा शरीरात ग्लुकोजची पातळी कमी होते आणि हायपोग्लाइसीमिया होतो तेव्हा जांभई येते. (Diabetes)

 

हृदयविकार

झोप पूर्ण झाल्यानंतरही दिवसभर जांभई येत असेल तर संशोधनानुसार जेव्हा हृदयाभोवती रक्तस्त्राव किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो तेव्हा असे होते. (Heart Attack)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT