Yoga Trends In 2022 Sakal
लाइफस्टाइल

Yoga Trends In 2022 : निरोगी राहण्यासाठी 2022 मध्ये होता 'या' योगासनांचा ट्रेंड

२०२२ हे वर्ष कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्याचे वर्ष होते.

सकाळ डिजिटल टीम

Yoga Trends In 2022 : अवघ्या काही दिवासांवर नववर्ष येऊन ठेपलं आहे. त्याचं स्वागत धूमधडाक्यात होईलच. २०२२ हे वर्ष कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्याचे वर्ष होते. गेल्या दोन वर्षांपासून जगभरात पसरलेला कोविड-१९ चा प्रादुर्भाव यावर्षी कमी झाला आहे. २०२२ मध्ये निरोगी राहण्यासाठी अनेकांनी विविध गोष्टींचा अवलंब केला.

हेही वाचा- Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

योगाभ्यास केल्याने शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. आज आम्ही २०२२ गुगलवर तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वाधिक ट्रेंडिंग असलेल्या योगासनांबद्दल माहिती सांगणार आहोत.

वज्रासन

वज्रासन

हा योगा गुडघ्यावर बसून केला जातो. वज्रासन करण्यासाठी प्रथम जमिनीवर गुडघे टेकून बसावे. त्यानंतर दोन्ही पायांचे अंगठे एकत्र जोडून घोट्याला वेगळे ठेवा. नितंबांना घोट्यांसह विश्रांती द्या आणि तळवे गुडघ्यांवर ठेवा. पाठ सरळ ठेवून दोन्ही गुडघे एकत्र करा. या पोझमध्ये काही मिनिटे बसावे.

सुखासन

सुखासन

सुखासन केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी हा योगा फायदेशीर मानला जातो. हे आसन करण्यासाठी चटईवर बसताना दोन्ही गुडघे जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच हात गुडघ्याजवळ ठेवून शरीर सरळ आणि पोट सामान्य स्थितीत ठेवा. या आसनात शरीर सैल सोडून 10 मिनिटे बसण्याचा प्रयत्न करा.

पर्वतासन

पर्वतासन

२०२२ मध्ये अनेकांनी तंदुरुस्त राहण्यासाठी पर्वतासनाला प्राधान्य दिले. हे आसन करण्यासाठी प्रथम वज्रासनात बसावे. त्यानंतर दोन्ही हात आणि पाय जमिनीवर हळूवारपणे ठेवावे. त्यानंतर कंबरेला त्रिकोणी आकाराप्रमाणे वरच्या बाजूस न्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT