Yoga Tips esakal
लाइफस्टाइल

Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत

Yoga Tips : सध्याची धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि झोपेची कमतरता इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga Tips : सध्याची धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि झोपेची कमतरता इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याच्या समस्यांनी लोक ग्रस्त आहेत. अशा स्थितीमध्ये व्यक्तीला दिवसभर थकवा जाणवतो. तुम्ही कोणतेही काम केले नाही किंवा पुरेशी विश्रांती जरी घेतली तरी हा थकवा जाणवतो.

हा थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी तुम्हाला दिवसभर अंथरूणावर झोपावेसे वाटेल. परंतु, हा यावरील उपाय नाही. सतत दिवसभर तुम्ही झोपून राहू शकत नाही. या थकव्यापासून आणि अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. योगामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल शिवाय, तुमचा स्टॅमिनाही वाढेल. तसेच, आतून तुमचे शरीर हलके आणि उत्साही राहील. चला तर मग जाणून घेऊयात या योगासनांबद्दल.

ताडासन

ताडासन या योगासनाचा नियमित सराव केल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. या योगासनामुळे संपूर्ण शरीर ताणले जाते. हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे राहा. आता तुमच्या पायांमध्ये काही अंतर ठेवा. त्यानंतर, दीर्घ श्वास घेऊन दोन्ही हात वर करा आणि ताणून घ्या.

या स्थितीमध्ये तुमच्या पायाच्या टाचा उंचावताना पायाच्या बोटांवर उभे राहा. या स्थितीमध्ये तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. काही सेकंद या स्थितीमध्ये थांबल्यानंतर हळूहळू सामान्य स्थितीमध्ये या. हे योगासन नियमित केल्याने तुमच्या शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होईल.

धनुरासन

धनुरासन या योगासनाचा दररोज सराव केल्याने अशक्तपणा आणि थकव्यापासून आराम मिळतो. यासोबतच थायरॉईडसाठी या योगासनाचा सराव करणे अतिशय फायदेशीर मानले जाते. यासोबतच लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे योगासन उपयुक्त आहे. या धनुरासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर झोपा. आता तुमचे गुडघे कमरेजवळ आणा.

आता तुमच्या दोन्ही पायांच्या घोट्यांना हातांनी धरण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर, डोके, छाती आणि मांड्या वरच्या बाजूला ताठ स्थितीमध्ये ठेवा. या स्थितीमध्ये तुमच्या शरीराचे वजन पोटाच्या खालच्या भागावर जाणवते. काही काळ या स्थितीमध्ये राहिल्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीमध्ये परत या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT