Yoga Tips  google
लाइफस्टाइल

Yoga Tips : पोटाची चरबी कमी करण्यास उपयुक्त असलेले भुजंगासन कसे करायचे?; जाणून घ्या त्याचे फायदे

आयुर्वेद आणि योग या दोन्हींचा जन्म भारतामध्ये झाला. भारतातून ह्या दोन्ही संकल्पना जगभरामध्ये पसरल्या गेल्या.

नमिता धुरी

मुंबई : भुजंगासन या योगाचे नाव भुजंग या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ साप किंवा नाग असा होतो. भुजंगासन योगा करताना शरीराची स्थिती सापासारखी होते. त्यामुळे त्याला असे नाव पडले असेल, असा अंदाज व्यक्त केला जातो. आयुर्वेद आणि योग या दोन्हींचा जन्म भारतामध्ये झाला. भारतातून ह्या दोन्ही संकल्पना जगभरामध्ये पसरल्या गेल्या.

निसर्गातील नानाविध घटकांवरुन प्रेरीत होऊन योगविद्या आणि आयुर्वेद तयार झाले आहेत. मनुष्याने ज्या गोष्टींचा शोध लावला, त्यांची मूळ प्रेरणा आजूबाजूच्या वातावरणातून घेतली गेलेली असते. त्याचप्रमाणे सापावरून याचे नाव भुजंगासन ठेवले असेल. या आसनात पोटावर झोपून शरीराचा पुढचा भाग समोर उभा केला जातो. ज्यामुळे पाठीचा कंबर आणि स्नायूंच्या समस्यांचा धोका कमी होण्यास विशेष फायदा होतो.

वजन कमी करण्यासाठी

भुजंगासन योग वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो शकतो. पोटातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तसेच हाडांची ताकद वाढवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे योगासन नियमित केल्याने शरीरातील मेटाबॉलिझमलाही चालना मिळते. ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात. याव्यतिरिक्त, अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि मणक्याचे स्नायू टोन करण्यासाठी आणि पाठदुखीपासून मुक्ती मिळते.

पचनक्रीया सुधारते

पोटाशी संबंधित समस्यांमध्येही या आसनाचा फायदा होतो. या आसनाच्या नियमित सरावाने पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे शरीरात अन्नाचे पचन लवकर व्हावे यासाठी पाचक रसांना निर्मीत करण्याचे कामही भुजंगासनामुळे होते. ज्या लोकांना बद्धकोष्ठता किंवा पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो,अशा लोकांना भुजंगासन योगाचा फायदा होतो.

रक्ताभिसरण क्रिया सुधारते

भुजंगासन योगासनामुळे हृदय आणि विविध अवयवांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होण्यास मदत होते. रक्तातील निरुपयोगी पदार्थ कमी करून चांगल्या प्रकारच्या हार्मोन्स वाढवते. हे आसन पाठदुखी आणि विकारांचा धोका कमी करण्यासाठी देखील ओळखले जाते. ज्या लोकांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांना या योगाच्या सरावाने विशेष फायदा होऊ शकतो.

कसे करावे भुजंगासन

भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा.

सर्व शरीर मोकळे करा. हाताचे पंजे छातीजवळ आणा. नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका.

पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा. असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Passes Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन! भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज हरपला

ASHA BHOSLE PASSES AWAY: बालपणीचा गोड क्षण, आशा भोसले आणि लता मंगेशकरांचा यांचा जुने फोटो Viral

Hormuz Strait: करार नाही, तणाव कायम… तरी होर्मुझमधून GOOD NEWS! जे घडलं ते जगाला थक्क करून गेलं! १६ जहाजांची धडाकेबाज एंट्री

Asha Bhosale: वयाच्या १० व्या वर्षी करिअरची सुरूवात ते २० भाषांत १२००० गाणी, गिनीज बुक मध्ये नोंद; 'असा' आहे आशाताईंचा संर्घषमयी जीवनप्रवास

Induction Safety Tips : इंडक्शन स्टोव्हजवळ अजिबात ठेऊ नका 'या' 5 वस्तू; नाहीतर लगेच होतील खराब, इंडक्शनही जळेल

SCROLL FOR NEXT