zodiac signs  esakal
लाइफस्टाइल

Zodiac Signs : या राशींच्या लोकांनी एकमेकांशी कधीच करू नये लग्न?नाहीतर संसाराचे वाजतील तीन तेरा!

तूमच्या जोडीदाराची रास कोणती आहे?

सकाळ डिजिटल टीम

लग्नाची गाठ कोणाशी बांधली जाणार हे देव ठरवतो, असे म्हणतात. या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामूळेच आपली विवाह संस्था उभी आहे. त्यामुळे लग्नाआधी वर वधुच्या कुंडली त्यांचे गुण मिळणे महत्त्वाचे मानले जाते. तसेच त्यांच्या राशी कोणत्या आहेत हेही आवर्जून पाहिले जाते.

प्रत्येक राशीचा स्वभाव, त्यांचा गुरू वेगळा असतो. त्यामूळे लग्न ठरवताना गुणांच्या आधी राशी कोणत्या आहेत. त्या एकमेकांशी जुळतात का? हे पाहिले जाते. राशी तूमचा स्वभाव काय आहे हे दर्शवतात. त्यामूळेच भिन्न स्वभावाच्या राशींनी एकत्र राहणे त्यांच्या नात्यासाठी योग्य नसते.

मग कोणी कोणत्या राशीच्या जोडीदारासोबत लग्न करावे. याबद्दल शास्त्रात काही नोंदी दिल्या गेल्या आहेत. ज्या तूमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतील.

मकर आणि मेष

चांगले विचार आणि राहणीमान असलेल्या मकर राशीच्या लोकांचे सूत मनमानी करणाऱ्या मेष राशीसोबत कधीही जूळत नाही. असे जोडपे एकत्र आल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो.

कुंभ आणि वृषभ

कुंभ राशीचे लोक हट्टी, स्वतंत्र विचाराचे असतात. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांशी ते सहसा जमत नाहीत. कुंभ आणि वृषभ राशीचे लोक एकत्र आले तर ते सतत छोट्या-छोट्या गोष्टींवर खूप भांडत बसतात. काहीवेळा त्यांच्यात मारामारीही होते. वृषभ राशीचे लोक कुंभ राशीच्या लोकांच्या मोकळ्या विचारांशी तडजोड करू शकत नाहीत. त्यामूळे जास्त वाद होतात.

मीन आणि मिथून

मीन राशीचे लोक उत्साही स्वभावाचे असतात. त्यामुळे अनेकदा ते मिथुन राशीच्या लोकांना समजत नाहीत. मिथुन राशीचे लोक फक्त स्वतःबद्दलच विचार करतात तर मीन राशीचे लोक इतरांच्या भावना, इच्छा यांची पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे दोघांचे वागणे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.

मेष आणि कर्क

मेष राशीचे लोक रागीट, तापट स्वभावाचे असतात. तर कर्क राशीचे लोक इतरांची काळजी घेणारे असतात. त्यांना तापट स्वभावाचे लोक आवडत नाहीत. त्यामूळे जेव्हा हे दोन व्यक्ती एका चांगल्या रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

मिथून आणि कन्या

उत्साही आणि जिज्ञासू मिथुन राशीच्या लोकांना अतिव्यावहारिक कन्या राशीचे लोक कंटाळवाणे वाटतात. मिथुन राशीचे लोक मोकळेपणाने आपले प्रेम दाखवतात तर कन्या राशीचे लोक या बाबतीत खूप लाजाळू असतात. त्यामुळे दोघांमध्ये म्हणावा तितका समजूतदारपणा आपल्याला दिसत नाही. मीन राशीचे लोक उत्साही स्वभावाचे असतात. त्यामुळे अनेकदा ते मिथुन राशीच्या लोकांना समजत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?

Latest Marathi News Updates: गोरक्षका विरुद्ध कारवाई करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल

गोविंदाच्या पत्नी सुनिताच होतं दुसऱ्या अभिनेत्यावर क्रश, कबुली देत म्हणाली...'गोविंदा त्याच्यासारखा दिसायचा म्हणून...'

Adventure ट्रेकिंगसाठी शोधताय खास ठिकाण? अरुणाचल प्रदेशातील 'या' आयो व्हॅली ट्रेकचा अनुभव घ्या!

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT