Shirur Loksabha Constituency sakal
लोकसभा २०२४

Shirur Loksabha Constituency : आढळरावांच्या संपत्तीत १० कोटींनी वाढ

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कुटुंबीयांकडे एकूण ३९ कोटी ६८ लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिवाजीराव आढळराव पाटील, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कुटुंबीयांकडे एकूण ३९ कोटी ६८ लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर १ कोटी ५१ लाख ४६ हजार रुपयांचे कर्ज आहे. मागील पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांनी शिवसेनेकडून याच मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्या वेळी त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर २९ कोटी १ लाख ६५ हजार ५५१ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता होती. आज त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्या कुटुंबीयांकडे ३९ कोटी ६८ लाखांची एकूण मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे.

आढळराव-पाटील यांच्यावर पुण्यासह चाकण, शिक्रापूर, भोसरी आणि आंबेगाव या पाच ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे ७ कोटी ४९ लाख ६६ हजार रुपयांची, तर त्यांची पत्नी कल्पना यांच्या नावावर ३ कोटी ४७ लाख १ हजार ५५८ एवढी स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे एकूण २ कोटी ७६ लाख ३ हजार ८३७, तर त्यांची पत्नीच्या नावावर २ कोटी ९१ लाख ३२ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. आढळराव यांच्या विविध बँक खात्यांमध्ये १ कोटी ३ लाख ६९ हजार रुपयांच्या ठेवी आहेत, तर ६ लाख ६८ हजार ४३५ रुपयांचे विविध कंपन्यांचे शेअर्स आहेत. त्यांच्याकडे एकच मोटार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT