आठ हजार जणांचे भवितव्य आज ठरणार Sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election Result 2024 : आठ हजार जणांचे भवितव्य आज ठरणार

१९९६ च्या निवडणुकीत १३,५२ जण रिंगणात होते, त्यानंतरचे सर्वाधिक उमेदवार याच निवडणुकीत

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालाला काही तासच शिल्लक असून यंदा देशभरातून आठ हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी जवळपास एक पंचमांश उमेदवार राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे असून बाकीचे सुमारे ८० टक्के उमेदवार हे अपक्ष आणि इतर स्थानिक व अमान्यताप्राप्त पक्षांचे आहेत. ‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च’ या संस्थेने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

दृष्टीक्षेपात लोकसभा निवडणूक २०२४

  • टप्पे - ७ (१९ एप्रिल ते १ जून)

  • उमेदवार - ८,३६०

  • राष्ट्रीय पक्षांतर्फे - १६ टक्के

  • प्रादेशिक पक्षांतर्फे - ६ टक्के

  • अपक्ष - ४७ टक्के

  • छोटे पक्ष - ३१ टक्के

  • ७४४ - एकूण पक्ष

  • ४८ - उमेदवारांचे सरासरी वय

  • ३२७ - विद्यमान खासदार असलेले

  • ३४ - इतर पक्षांतर्फे लढणारे विद्यमान खासदार

  • ५३ - विद्यमान मंत्री

निवडणुकीची वैशिष्ट्ये

  • १९९६ च्या निवडणुकीत १३,५२ जण रिंगणात होते, त्यानंतरचे सर्वाधिक उमेदवार याच निवडणुकीत

  • प्रत्येक मतदारसंघातून सरासरी १५ उमेदवार

  • तेलंगणमध्ये प्रत्येक मतदारसंघातून सरासरी ३१ उमेदवार, तर नागालँड व लडाखमध्ये तीन उमेदवार

  • तमिळनाडूमधील करूर मतदारसंघात सर्वाधिक ५४ उमेदवार (पैकी ४६ अपक्ष)

पक्ष व उमेदवार

  • बसप ४८८

  • भाजप ४४१

  • काँग्रेस ३२८

  • माकप ५२

  • आप २२

  • सप ७१

  • तृणमूल ४८

  • अण्णा द्रमुक ३६

  • भाकप ३०

  • वायएसआर काँग्रेस २५

  • राजद २४

  • द्रमुक २२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT