Amitabh Bachchan entered the Parliament  sakal
लोकसभा २०२४

किस्से निवडणुकीचे : प्रेमाने दिलेले मत ठरले अवैध

मतदान ही अत्यंत विचारपूर्वक करायची बाब आहे. आपल्याकडे मात्र काही लोक भावनेच्या भरात मतदान करतात. याचे उदाहरण १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत अलाहाबाद मतदारसंघात पाहायला मिळाले होते.

सकाळ वृत्तसेवा

मतदान ही अत्यंत विचारपूर्वक करायची बाब आहे. आपल्याकडे मात्र काही लोक भावनेच्या भरात मतदान करतात. याचे उदाहरण १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत अलाहाबाद मतदारसंघात पाहायला मिळाले होते. या मतदारसंघात झालेल्या लढतीत सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी भारतीय लोकदलाचे दिग्गज नेते हेमवती नंदन बहुगुणा यांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला होता. ही निवडणूक विविध कारणांमुळे चांगलीच गाजली होती.

हेमवती नंदन बहुगुणा हे मूळ काँग्रेसचेच नेते. आणीबाणी प्रकरणावेळी त्यांनी पक्षत्याग करत जनता पार्टीला साथ दिली. जनता पार्टीचे सरकार स्थापन होण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा होता. यामुळे काँग्रेसचा त्यांच्यावर राग होता. १९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या ऑक्टोबरमध्ये झाली आणि त्याच वर्षी डिसेंबरअखेर लोकसभेची निवडणूक झाली.

इंदिरा गांधींनंतर पक्षाची आणि विजयाची जबाबदारी राजीव गांधी यांच्या खांद्यावर आली होती. अलाहाबादमधून काँग्रेसने के. पी. तिवारी यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, बहुगुणा यांनी येथून उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजीव यांनी अगदी ऐनवेळी त्यांचे मित्र अमिताभ बच्चन यांना मैदानात उतरविले.

बहुगुणा हे कसलेले राजकारणी असले आणि अलाहाबादमधून एकदा विजयीही झाले असले तरी, सुपरस्टार असलेल्या अमिताभ यांच्या ‘ग्लॅमर’ची मोहिनी तमाम लोकांवर होती. या ग्लॅमरचा प्रभाव मतदानातही दिसला. मतमोजणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जेव्हा मतपेट्या उघडल्या, त्यावेळी ते आश्‍चर्याने थक्क झाले.

अनेक मतपत्रिकांवर युवतींनी अमिताभ यांच्या नावासमोर शिक्का तर मारलाच होता; पण ओठांवरील लिपस्टिकचा वापर करत आपल्या प्रेमाचाही ठसा उमटविला. अर्थात, लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका बाद ठरल्या. पण तरीही, अमिताभ यांचा एक लाख ९० हजार मतांनी विजय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT