Loksabha Election 2024  sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : पुण्यात ३५, शिरूरमध्ये ३२ उमेदवार रिंगणात

पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज माघारीची मुदत सोमवारी (ता. २९) संपुष्टात आली. पुण्यातून सात, तर शिरूरमधून तीन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे पुण्यातून ३५ आणि शिरूरमधून ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज माघारीची मुदत सोमवारी (ता. २९) संपुष्टात आली. पुण्यातून सात, तर शिरूरमधून तीन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे पुण्यातून ३५ आणि शिरूरमधून ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. पुणे आणि शिरूर मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी (ता. २५) संपली.

या कालावधीत पुण्यातून ४२ आणि शिरूरमधून ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी (ता. २६) दोन्ही मतदारसंघांतील अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये पुण्यातून एकही अर्ज बाद झाला नाही, तर शिरूरमधून अपक्ष ११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे पुण्यातून ४२ आणि शिरूरमधून ३५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. सोमवारी अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत पुण्यातून सात उमेदवारांनी माघार घेतली.

त्यात पुण्यातून महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांनी पर्यायी (डमी) अर्ज सादर केला होता, त्यांनी माघार घेतली. त्यासह एकूण सात जणांनी अर्ज माघारी घेतले. शिरूरमधून तीन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता पुण्यातून ३५ आणि शिरूरमधून ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती पुण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे आणि शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली.

तीन बॅलेट युनिट लागणार

ईव्हीएम मशिनवरील बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांसाठीच बटणाची मर्यादा आहे. एक बटण नोटा मतासाठी असते. त्यामुळे जर १५ उमेदवार रिंगणात असतील, तर एकच बॅलेट युनिट वापरावे लागते. आता पुणे मतदारसंघातून ३५ उमेदवार आणि शिरूरमधून ३२ उमेदवार रिंगणात असल्याने दोन्ही मतदारसंघांत तीन बॅलेट युनिट वापरावे लागणार आहेत.

‘ट्रम्पेट’ला आक्षेप नाही

आयोगाने सोमवारी उमेदवारांना चिन्हांचेही वाटप केले. त्यामध्ये शिरूरमधील एका अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट (तुतारी) चिन्ह दिले. मात्र त्याला कुणीही आक्षेप घेतला नाही. बारामती मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला हे चिन्ह दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला होता. शिरूरमध्ये उपस्थित उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी ‘ट्रम्पेट’ चिन्ह अपक्षाला दिल्यानंतर आक्षेप घेतला नसल्याची माहिती शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांनी स्पष्ट केले. पुणे मतदारसंघातील वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांना ‘रोडरोलर’ चिन्ह मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT