Crime News sakal
लोकसभा २०२४

Crime News : आग्रा येथे सापडला ‘नोटांचा ढीग’;प्राप्तिकर खात्याच्या छाप्यांत साठ कोटींहून अधिक रोकड जप्त

येथील चप्पल व्यावसायिकांवर प्राप्तिकर विभागाने छापा घातल्यानंतर हाती लागलेला पैसा डोळे पांढरे करणारा आहे. गेल्या दोन दिवसांपासून पैशाची मोजदाद सुरू असून ती रोकड शंभर कोटींपेक्षा अधिक असल्याचा दावा केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

आग्रा : येथील चप्पल व्यावसायिकांवर प्राप्तिकर विभागाने छापा घातल्यानंतर हाती लागलेला पैसा डोळे पांढरे करणारा आहे. गेल्या दोन दिवसांपासून पैशाची मोजदाद सुरू असून ती रोकड शंभर कोटींपेक्षा अधिक असल्याचा दावा केला जात आहे. मशिनच्या मदतीने ६० कोटींची रोकड मोजली असून अजूनही त्याची मोजणी सुरूच आहे.

आग्रा शहरातील हरमिलाप ट्रेडर्स, मन्शू फुटविअर आणि बी.के शूजच्या मालकांवर प्राप्तिकर खात्याने शनिवारी छापे घातले. आग्रा शहरातील चप्पल व्यावसायिकांचा ‘चिठ्‌ठी’वर चालणारा काळा व्यवसाय प्रकाशझोतात आल्याने अन्य व्यापाऱ्यांचा धाबे दणाणले आहे. हरमिलाप ट्रेडर्सचे रामनाथ डंग, बी.के शूजचे अशोक मिड्डा आणि मन्शू फुटविअरचे हरदीप मिड्डा हे तिघेही नातलग आहेत.

प्राप्तिकर विभागाने व्यावसायिकांचे घर, कारखाना, गोदाम आरि दुकानांची झडती घेतली. संगणक, लॅपटॉप, मोबाईल जप्त केले आहेत. मालमत्तेतील गुंतवणुकीचे कागदपत्रे देखील हस्तगत करण्यात आले आहेत. तीस तासांहून अधिक काळ झालेल्या तपासणीसत्रात घरातून कोणीही बाहेर येऊ शकले नाही आणि कोणीही आत आले नाही. काल सायंकाळी तपासणीदरम्यान उशीर होत असल्याचे पाहून प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुक्कामासाठी एका तंबू व्यापाऱ्यांकडून गाद्या मागवल्या आणि पोलिस कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर रात्र काढली.

गादीखाली लपविले पैसे

सकाळी पुन्हा नव्याने मोजणी सुरू केली. ती रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६० कोटींची मोजणी केली आहे. शनिवारी रात्रीपर्यंत ४० कोटी रुपये मोजले होते. जप्त केलेली एकूण रक्कम शंभर कोटी मानली जात आहे. मात्र जप्त केलेल्या रक्कमेबाबत दुजोरा मिळाला नाही. तसेच छाप्याबाबत अधिकृत निवेदन जारी केले नाही. हरमिलाप ट्रेडर्स, बी.के. शूज आणि मन्शू फुटवियर यांच्या चौदा ठिकाणांसह प्राप्तिकर विभागाने संपूर्ण तयारीनिशी छापा घातला. अलोकनगर येथील रामनाथ डांग यांच्या घरी, कमलानगर येथील पूर्ती निवास, बृजबिहार, एमजी. रोड, पूर्व विला सूर्यनगर, शंकर ग्रीन, सिकंदरा, हीग की मंडी येथील श्रीराम मंदिर मार्केट, धाकरान चौक येथे दिवसभर प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या गाड्यांची वर्दळ राहिली आणि फौजफाटाही राहिला. व्यावसायिकांनी गादीखाली, कपाटात, चप्पल स्टँड आदी ठिकाणी पैसे लपवून ठेवले हेाते.

चिठ्ठीमुळे गुन्हा उघडकीस

आग्रा येथे वीस हजार कोटींची उलाढाल चप्पल व्यवसायात होते. या ठिकाणी पैशाऐवजी चिठ्ठीने मोठे व्यवहार होतात. सात मे रोजी मतदान होते. अशावेळी अनेक चिठ्ठ्यांचे पैसे वाटप झाले नाही. निवडणुकीनंतर चिठ्ठीने देण्यात येणाऱ्या पैशाची देवाणघेवाण करण्याची आणि करात फेरकार केल्याची तक्रार प्राप्तिकर खात्यापर्यंत पोचली. त्यानंतर छापा घातला असता मोठे घबाड हाती लागले. शहरातील व्यापार हा उधारीवर अधिक चालतो. ट्रेडर्स आणि मोठे व्यापारी हे लहान व्यापाऱ्यांना तत्काळ पैसे देण्याऐवजी चिठ्ठी तयार करून देतात. त्यावर तारीख आणि कालावधी लिहिलेला असतो. ठरलेल्या तारखेला चिठ्ठी देणारे व्यापारी लहान व्यापाऱ्यांकडून पैसे घेतात. हे संपूर्णपणे काळाबाजार आहे. एकीकडे व्यापारात रोख दिसत नाही आणि दुसरीकडे करचुकवेगिरी होते. वेळेत पैसे न देणाऱ्या चिठ्ठीवर तीन टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते.

उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता

प्राप्तिकर विभागाने चप्पल व्यावसायिक हरमिलाप ट्रेडर्सचे रामनाथ डंग यांच्या घरी उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता तसेच बेहिशोबी मालमत्तेचे कागदपत्रे सापडली आहे. ती कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. अन्य ठिकाणी कर भरण्यात फेरफार केल्याचेही निदर्शनास आले आहे. काही कागत्रपत्रांत व्याजाचा हिशोब आहे. चप्पल व्यवसायाच्या नावाखाली व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करत असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: आम्ही स्वतःला जाळून घेऊ! बेकायदा इमारतीमधील राहिवाशांची आर्त हाक; डोंबिवलीत काय घडलं?

ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर 'ही' अभिनेत्री साकारणार पुर्णा आजीची भूमिका? 'त्या' गोष्टीमुळे चर्चेला उधाण

Asia Cup 2025: आक्रमक होणारच! IND vs PAK सामन्याआधी भारताचा कर्णधार सूर्यकुमार अन् पाकिस्तानी सलमान आघाने फुंकले रणशिंग

Pitru Paksha 2025: शॉपिंगसाठी ‘या’ तारखा शुभ, दोष न लागता पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील

Crime News : परप्रांतीय कंटेनर चालकाला लुटणाऱ्या दोघींना अटक; नाशिकमध्ये गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT