Amit Shah sakal
लोकसभा २०२४

Amit Shah : ‘इंडिया’ पंतप्रधानपदाची संगीतखुर्ची करेल

लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला सत्ता मिळाली तर घटकपक्षांना क्रमाक्रमाने पंतप्रधानपदाची खुर्ची देण्याचे नियोजन या आघाडीकडून केले जात आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. बिहारमधील मधुबनीत प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

मधुबनी (बिहार) : लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला सत्ता मिळाली तर घटकपक्षांना क्रमाक्रमाने पंतप्रधानपदाची खुर्ची देण्याचे नियोजन या आघाडीकडून केले जात आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. बिहारमधील मधुबनीत प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते.

देशाला सशक्त नेत्याची गरज असून वार्षिक तत्त्वावर अशा नेत्याच्या नियुक्तीची आवश्यकता नाही, असा टोलाही त्यांनी मारला. अमित शहा म्हणाले, की ‘इंडिया’ आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहराच नाही. देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे ठरविले आहे. इंडियाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, हे तुम्ही मला सांगू शकाल का. ते म्हणाले, ‘‘त्यांनी पंतप्रधानांची खुर्ची आपापसांत फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. देश चालविणे म्हणजे एखादे किराणा मालाचे दुकान चालविण्यासारखे नाही.’’

जर कोरोना साथीसारखी परिस्थिती पुन्हा उद्‌भवली तर इंडियाचे नेते देशाला वाचवू शकतील का, ते देशाला दहशतवाद्यांपासून संरक्षण देऊ शकतील का, आपल्या देशाला सशक्त पंतप्रधानपदाची गरज असून वार्षिक तत्त्वावरील पंतप्रधानाची आवश्यकता नाही, असेही शहा म्हणाले.

गोहत्येला ‘एनडीए’चा विरोध

बिहारच्या उत्तर भागात पूर्वी झालेल्या गुरांच्या तस्करीचा उल्लेख करत अमित शहा म्हणाले, की ‘एनडीए’ सरकार गोहत्येविरुद्ध आहे. आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत गोहत्या होऊ देणार नाही. पीएफआय या संघटनेवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच होता. या संघटनेला भारत इस्लामिक देश बनवायचा होता, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT