Amit Shah  Sakal
लोकसभा २०२४

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

''काँग्रेस, सपा आणि बसपावाले खोटा प्रचार करुन भाजप आणि मोदींना बदनाम करत आहेत. मोदींना ४०० जागा दिल्या तर ते आरक्षण संपवतील, असं म्हणत आहेत. कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळालं तर त्यांनी मागास प्रवर्गाचं आरक्षण काढून मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिलं. मागासांच्या आरक्षणाला धक्का लावल्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं आहे.''

संतोष कानडे

Amit Shah Speech : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लखीमपूरमध्ये एका प्रचारसभेला संबोधित केलं. समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांच्या विधानाचा त्यांनी समाचार घेतला.

''हे लोक राम मंदिराला बेकार म्हणतात.. तुम्ही जराही चूक केली तर हे राम मंदिराला बाबरी नावाचं कुलूप ठोकतील. उत्तर प्रदेशात जेव्हा समाजवादी पक्षाचं सरकार होतं तेव्हा गुंडाराज सुरु होतं. जमिनींवर कब्जे केले जात होते. होळी-दिवाळीला वीज नसायची आणि रमजानमध्ये २४ तास वीज असायची.'' असा आक्षेप अमित शाहांनी घेतला.

शाह पुढे म्हणाले की, काँग्रेस, सपा आणि बसपावाले खोटा प्रचार करुन भाजप आणि मोदींना बदनाम करत आहेत. मोदींना ४०० जागा दिल्या तर ते आरक्षण संपवतील, असं म्हणत आहेत. कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळालं तर त्यांनी मागास प्रवर्गाचं आरक्षण काढून मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिलं. मागासांच्या आरक्षणाला धक्का लावल्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.

राहुल गांधींवर निशाणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींचा खरपूस समाचार घेतला. ''राहुल गांधी म्हणतात एका झटक्यात गरीबी दूर करु. तुमच्या आजीने एका झटक्यात आणीबाणी घोषित केली होती. वडिलांनी एका झटक्यात तीन तलाख लागू केला होता. तुमच्या पक्षाने एका झटक्यात मागासांचं आरक्षण काढून घेण्याचं काम केलं.'' अशा शब्दांत शाहांनी टीका केली.

अमित शाहांनी त्यांच्या भाषणात सीएएचा उल्लेख करुन काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, राहुलबाबा म्हणात आम्ही सीएए हटवू.. आरे राहुल बाबा.. तुमची नानी जरी वरतून आली तरी सीएए हटणार नाही. तुमच्याकडे न नेता आहे, न नियत आहे, न निती आहे.. आहे ती केवळ घराणेशाही, असा सणसणीत टोला शाहांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: What a Catch! शुभमन गिलचा श्रीलंकेला स्तब्ध करणारा झेल, भारताच्या फिरकीसमोर यजमान फेल! Video Viral

Model Antara Banerjee FIR : अभिनेत्रीचा धावत्या ट्रेनमध्ये RPF जवानावर रेझर ब्लेडने हल्ला; आधी स्वत:चे कपडे काढले अन् मग...

आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या पडद्यावर सलमान-संजयची जोडी झळकणार, '7 डॉग्स' कधी होणार प्रदर्शित?

Sunetra Pawar: अजितदादांचा विकासाचा वारसा अर्ध्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा निर्धार, महिलांसाठी ‘दादा उद्योगिनी’ ॲप

Loggerhead Turtle: अरबी समुद्रातून १०० किलो वजनाच्या दुर्मिळ 'लॉगरहेड' कासवाची सुटका

SCROLL FOR NEXT