Anjali Damania on Raj Thackeray 
लोकसभा २०२४

Anjali Damania: "आखिर कहना क्या चाहते हो?" दमानियांचा राज ठाकरेंना सवाल

मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसाठी एनडीएला पाठिंबा जाहीर केला. यावरुन त्यांच्या भूमिकेवर उलटसुलट चर्चा सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नाशिक : मनसेचा पाडवा मेळावा मंगळवारी पार पडला. यामध्ये राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसाठी एनडीएला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. पण आता त्यांच्या या भूमिकेवर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील भाष्य केलं आहे. आखिर कहना क्या चाहते हो? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. (Anjali Damania on Raj Thackeray over Raj Thackeray speech at Padva Melava)

अंजली दमानिया म्हणाल्या, "राज ठाकरेंचं भाषण जर आपण ऐकलं तर ते सैरभैर झालेले दिसले. त्यांनी अनेकदा मोदी सरकारवर टीका केली. नोटाबंदीवर बोलले, रोजगार नाही यावर बोलले. एकीकडं बोलले मोदींचं काम ठीक नव्हतं म्हणून २०१४-१९ मध्ये मी टीका केली. मला खुर्ची नको होती त्यातच ते मध्येच एखादा टोला उद्धव ठाकरेंनाही मारत होते" (Latest Maharashtra News)

यामध्ये ते फक्त आपल्या भूमिकांचं जस्टिफिकेशन देत होते. मध्येच त्यांनी मीडियावर एक टोमणा मारला. जसं राज ठाकरे एरव्ही बोलतात, तसं कालचं भाषण नव्हतं. त्यांच्या भाषणात काही कॉमेडी असते तसंही त्याचं नव्हतं. ते गोंधळलेले वाटत होते त्यामुळं मी भाषणानंतर ट्विटही केलं होतं की, आखिर कहना क्या चाहते हो. त्यांना नक्की काय म्हणायचं होतं हेच लोकांना कळेना, असंही दमानिया यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

एवढ्या लांबून त्यांचे कार्यकर्ते काल आले होते पण त्यांचं भाषण पहिल्यांदाच अगदी छोटसं भाषण झालं. हे भाषण ऐकून मनसेचे कार्यकर्ते देखील नाराज झाले असतील. पण काल त्यांनी भाजपला पाठिंबा दिला पण आधीच ते दोन-तीन वेळी म्हणाले की, राजकारणातील व्याभिचाऱ्याला राजमान्यता देऊ नका. (Marathi Tajya Batmya)

पण त्यानंतर लगेचच त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. यामुळं त्यांच्या मागे ईडीचं चक्र होतं म्हणूनच त्यांनी पाठिंबा दिला का? अशा प्रश्नही मनात येतो. पण हा बिनशर्त पाठिंबा देताना कारण काहीच नव्हतं. कारण तुम्हाला लोकसभेची खुर्ची नाही, राज्यसभा नाही. तुम्हाला काहीच नाही आणि तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. इतकं काही सध्या लोककल्याण करणारे राजकारणी उरलेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT