लोकसभा २०२४

Baramati Loksabha election : ''बारामतीमधील स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही 45 मिनिटं का बंद होते?'' निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

संतोष कानडे

पुणेः बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्व ईव्हीएम मशिन्स ज्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले होते, तेथील सीसीटीव्ही बंद झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला होता. तब्बल ४५ मिनिटे सीसीटीव्ही मॉनिटरिंग बंद असल्याचं निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली.

बारामतीच्या स्ट्राँग रुममधील सीसीटीव्ही बंद असल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यामुळे यंत्रणेची धावपळ उडाली. त्यानंतर काही वेळातच सीसीटीव्ही मॉनिटरिंग सुरु झालं. तब्बल ४५ मिनिटे हे कॅमेरे बंद होते. या प्रकरणी निवडणूक विभागने स्पष्टीकरण दिलं आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी सांगितलं की, या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली आहे. इलेक्ट्रिक कामासाठी केबल काढल्याने सीसीटीव्ही मॉनिटरिंग बंद होतं. सीसीटीव्ही कॅमेरे सुरच होते, त्याचा डेटा रेकॉर्ड झालेला आहे. परंतु केवळ डिस्प्ले बंद होतं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी याबाबत आवाज उठवला होता. 'साम टीव्ही'शी बोलताना लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, "बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशिन्स ज्या गोदामात ठेवलेले आहे त्या गोदामाचे सीसीटीव्ही सकाळी 10:25 पासून 45 मिनिटांपासून बंद आहेत.त्यामुळे यामध्ये काही काळंबेरं तर नाही ना याची शंका येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT