Loksabha Election 2024|Voting In Maharashtra 
लोकसभा २०२४

Video: दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार; पाहा, व्हिडिओ अन् फोटो

Loksabha Election 2024: अशात आज सुरू झालेल्या मतदानासाठी राज्यातील दिग्गज राजकीय नेत्यांसोबत अभिनेत्यांनीही आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरूवात झाली आहे. या निवडणुकीच्या 543 जागांसाठी देशात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी देशाचा पुढचा पंतप्रधान कोण हे ठरणार आहे.

अशात आज सुरू झालेल्या मतदानासाठी राज्यातील दिग्गज राजकीय नेत्यांसोबत अभिनेत्यांनीही आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यासह पत्नी प्रतिभा पवार, राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) उमेदवार सुप्रिया सुळे त्यांचे पती सदानंद सुळे आणि कन्या रेवती सुळे यांनी बारामती येथिल मतदान केंद्रावर मतदान केले. मतदानानंतर पवार-सुळे कुटुंबियांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हारल होत आहे.ो

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघात काटेवाडी येथे पत्नी आणि पक्षाच्या उमेवार सुनेत्रा पवार व आई आशाताई पवार यांच्यासह मतदान केले. यानंतर अजित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन मतदान केल्याचा फोटो शेअर केला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अभिनेते रितेश देशमुख यांनी लातून लोकसभा मतदारसंघात मतदान केले. यावेळी रितेश यांच्यासोबत त्यांची आई आणि पत्नी जिनेलिया देशमुखही यांनी मतदान केले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी सोलापूरातील मतदान केंद्रावर मतदान केले.

यंदा प्रथमच लोकसभा लढवत असलेल्या प्रणिती यांच्यासमोर भाजपचे आमदार राम सातपुते यांचे आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT