PM Narendra Modi esakal
लोकसभा २०२४

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

मोदींचे निधन झाले, तर या देशात पुढे पंतप्रधान होणारच नाहीत का?

सकाळ डिजिटल टीम

आजचे तरुण ‘मोदी, मोदी’चा जयघोष करतात. तुम्ही मोदींना घेऊन करणार काय? राज्यातील मतदारांचे म्हणणे आहे की, त्यांना काँग्रेसचे सरकार हवे आहे. पण, केंद्रात मोदी आले पाहिजेत.

बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे निधन झाले, तर या देशात कोणीही पंतप्रधान होणार नाही का? मोदी मेले तर १४० कोटी लोकसंख्येमध्ये पंतप्रधानपदाचा कोणीच पात्र उमेदवार नाही का? असा अजब सवाल करत काँग्रेसचे आमदार राजू कागे (Congress MLA Raju Kage) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले.

बेळगाव जिल्ह्यातील (Belgaum Lok Sabha) कागवड तालुक्यातील ममदापूर गावात झालेल्या निवडणूक प्रचारसभेत बोलताना त्यांनी मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदींचे निधन झाले, तर या देशात पुढे पंतप्रधान होणारच नाहीत का? मोदींचा मृत्यू झाला तर १४० कोटी लोकसंख्येमध्ये पंतप्रधानपदासाठी कोणी पुढे येणार नाही का? असे त्यांनी विचारले.

आजचे तरुण ‘मोदी, मोदी’चा जयघोष करतात. तुम्ही मोदींना घेऊन करणार काय? राज्यातील मतदारांचे म्हणणे आहे की, त्यांना काँग्रेसचे सरकार हवे आहे. पण, केंद्रात मोदी आले पाहिजेत. इथल्या समस्या मोदी येऊन बघणार का? इथे अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी मोदी येणार नाहीत. येथे आम्हीच तुमची समस्या ऐकतो. तीन हजार कोटींच्या विमानात प्रवास करून मोदी चार लाखांचा सूट घालतात. अशा लोकांना घेऊन काय करायचे, असा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून माओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

PMC Election : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT