Loksabha Election saka
लोकसभा २०२४

Loksabha Election : हरियाणा काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली ; परिस्थिती अनुकूल, तरीही कुरघोडीचे राजकारण रंगले

हरियानामध्ये अपक्ष आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप बचावात्मक पवित्र्यात असताना काँग्रेस पक्षात मात्र गटबाजी उफाळली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: हरियानामध्ये अपक्ष आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप बचावात्मक पवित्र्यात असताना काँग्रेस पक्षात मात्र गटबाजी उफाळली आहे. माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा गट विरुद्ध माजी प्रदेशाध्यक्ष कुमारी शैलजा आणि काँग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस रणदीप सुरजेवाला गट यांच्यात केंद्रीय नेत्यांच्या प्रचार सभांवरून कुरघोडीचे राजकारण रंगले असल्याचे समजते.

हरियानातील लोकसभेच्या दहा जागा गेल्यावेळी भाजपने जिंकल्या होत्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का देण्यासाठी आणि यानिमित्ताने चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची वाटचाल सुकर करण्यासाठी काँग्रेसनेही रणनीती आखली आहे. यात निवडणुकांची सर्व सूत्रे केंद्रीय नेतृत्वाने माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांच्याकडे सोपविली आहेत.

राज्यात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची (आप) आघाडी झाली असून कुरुक्षेत्र मतदार संघात आम आदमी पक्षाचे सुशील गुप्ता उमेदवार आहेत. कुरुक्षेत्रमध्ये काँग्रेसमधून आलेले उद्योगपती नवीन जिंदल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. याव्यतिरिक्त अंबाला, हिसार, सिरसा, कर्नाल, सोनिपत, रोहतक, भिवानी- महेंद्रगड, गुरुग्राम, फरिदाबाद या नऊ मतदार संघांचा समावेश आहे. यातील सिरसा मतदार संघांमध्ये अशोक तंवर हे भाजपचे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या कुमारी शैलजा लढत आहेत.

भूपिंदरसिंह हुड्डा यांनी हरियानातील नऊ जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, सिरसा मतदार संघातील प्रचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी केंद्रीय नेत्यांकडे आल्या आहेत. यामुळे शैलजा गटामध्ये अस्वस्थता आहे. कुरुक्षेत्र मतदार संघ हा ‘आप’ला दिला असूनही तेथे हुड्डा गटाची सक्रियता लक्षणीय आहे, तर दुसरीकडे सिरसाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे अशा तक्रारी कार्यकर्त्यांकडून होत आहेत.

शैलजा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना हुड्डा यांची गैरहजेरीही चर्चेचा विषय ठरली होती. या घटनाक्रमानंतर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना या वादात हस्तक्षेप करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर आता सिरसामध्ये कुमारी शैलजा यांच्यासह रणदीप सुरजेवाला आणि किरण चौधरी यांच्या गटाने लक्ष केंद्रित केले आहे. या गटामध्ये आता चौधरी वीरेंद्रसिंह यांचाही समावेश झाला आहे. आता केंद्रीय नेते मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या सभांसाठी देखील या दोन्ही गटांमध्ये कुरघोडी सुरू आहे. हरियानाचे प्रभारी असलेले दीपक बाबरिया यांना या दोन्ही गटांत समेट घडवून आणण्यात यश आले नसल्याचेही कळते.

दीर्घकाळापासून सुप्त संघर्ष

हरियाना काँग्रेसमध्ये दीर्घकाळापासून भूपिंदरसिंह हुड्डा विरुद्ध कुमारी शैलजा असा काँग्रेस अंतर्गत संघर्ष राहिला आहे. यामध्ये रणदीप सुरजेवाला, माजी विरोधी पक्षनेत्या किरण चौधरी यांचेही स्वतंत्र गट आहेत. किरण चौधरी या त्यांच्या कन्या श्रुती चौधरी यांना भिवानी-महेंद्रगडमधून उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होत्या. तर, पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आणि अलीकडेच भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झालेले वरिष्ठ जाट नेते चौधरी वीरेंद्रसिंह हेदेखील त्यांचे पुत्र ब्रजेंद्रसिंह यांच्या उमेदवारीसाठी हिसारमधून आग्रही होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: यवतमाळमध्ये भाजपला धक्का, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठ्या नेत्याच्या पत्नीचा पराभव

Pune Nagradhyakhsa : पुण्यात फक्त अजितदादा! १७ पैकी १० नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे, महाविकासआघाडीचा सुपडा साफ

New Year Travel Tips: शिमला-कुल्लु-मनाली? नवीन वर्षात हिल स्टेशनला जाण्याचा विचार करत असाल तर 'या' चुका करु नका

शुभमन गिलसोबत विश्वासघात! T20 World Cup संघातून हाकलल्याचे केव्हा सांगितले? आत्ताची मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update: २६ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार रेल्वेचे नवीन भाडे नियम

SCROLL FOR NEXT