Former Chief Minister of Andhra Pradesh Chandrababu Naidu esakal
लोकसभा २०२४

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

‘देवीचे दर्शन घेऊन समाधान वाटले. सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, सर्वांना सुख मिळावे अशी कामना देवीकडे केली.’

सकाळ डिजिटल टीम

माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे काल (गुरुवार) अकरा वाजण्याच्या सुमारास विमानतळावर आले. तेथून त्यांचा ताफा अंबाबाई मंदिर (Ambabai Temple Kolhapur) परिसरात आला.

कोल्हापूर : देशात भाजप (BJP) आणि मित्र पक्षांसाठी सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एन.डी.ए.ला चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी केला. त्यांनी आज सपत्निक करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे काल (गुरुवार) अकरा वाजण्याच्या सुमारास विमानतळावर आले. तेथून त्यांचा ताफा अंबाबाई मंदिर (Ambabai Temple Kolhapur) परिसरात आला. दक्षिण दरवाजातून ते मंदिरात गेले आणि देवीचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर हक्कदार श्रीपूजकांनी नायडू यांच्या पत्नी नाराभुवनेश्वरी यांना साडी भेट दिली.

यावेळी त्यांच्यासोबत आमदार पी. केशव आणि राघवेंद्र स्वामी मठाचे व्यवस्थापक के. रामराव हे उपस्थित होते. मंदिरातून बाहेर आल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नायडू म्हणाले, ‘देवीचे दर्शन घेऊन समाधान वाटले. सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, सर्वांना सुख मिळावे अशी कामना देवीकडे केली.’ येथून पुढे ते शिर्डीला रवाना झाले. चंद्राबाबू नायडू यांचे स्वागत करण्यासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आदिल फरास, माजी उपमहापौर महेश सावंत, परीक्षित पन्हाळकर, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, सनाउल्ला थोडगे, ओंकार माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आंध्र प्रदेशच्या भाविकांकडून चंद्राबाबूंचा जयघोष

मंदिरात आंध्र प्रदेशमधून भाविक दर्शनासाठी आले होते. सुरक्षेच्या कारणामुळे त्यांना लांब उभे राहावे लागले होते. त्यांना अचानक चंद्राबाबू नायडू दिसल्यावर त्यांनी चंद्राबाबूंच्या विजयाच्या घोषणा दिल्या. नायडू यांनीही त्यांना लांबून हात दाखवत अभिवादन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT