Eknath Shinde Esakal
लोकसभा २०२४

Shiv Sena: काँग्रेसकडून जिंकला अन् आता शिंदेंच्या सेनेकडून? मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी दिग्गज अभिनेता मैदानात

Govinda: गजानन किर्तीकर यांचे वय लक्षात घेता, त्याच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा या अनुशंगाने या अभिनेत्याच्या नावाची चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता गोविंदा आहुजा याचे नाव सध्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघासाठी चर्चेत आले आहे. लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काही दिवसांपूर्वी या अनुशंगाने अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे. गजानन किर्तीकर यांचे वय लक्षात घेता, त्याच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा या अनुशंगाने गोविंदाच्या नावाची चर्चा आहे.

या आधी गोविंदा यांनी २००४ मध्ये उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवत भाजपच्या राम नाईकांच्या अभेद किल्ल्याला भगदाड पाडत काॅग्रेसचा झेंडा रोवला होता.

अभिनेता म्हणून गोविंदा प्रसिद्ध असून राजकीय डावपेचांतीही त्यांना जाण असल्याने अमोल किर्तीकर यांच्या विरोधात हा चेहरा चालू शकतो. त्यामुळे गोविंदा यांच्या नावाची चाचपणीही सुरू असल्याची माहिती मिळते.

या आधीही या जागेसाठी अक्षय कुमार, माधुरी दिक्षित, नाना पाटेकर, यांना विचारणा करण्यात आली होती. मात्र अक्षय व नानांनी स्पष्ठ नकार दिला. तर माधुरी दिक्षित यांच्याकडून उत्तरच आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT