Chikkodi Loksabha Constituency esakal
लोकसभा २०२४

चिंगळेंना 'बुडा'चे अध्यक्षपद दिल्याने प्रियंका जारकीहोळींचा 'चिकोडी'चा मार्ग मोकळा! पालकमंत्र्यांची मुलगी थेट जोल्लेंना देणार टक्कर?

चिकोडी लोकसभा मतदारसंघातून (Chikkodi Loksabha Constituency) काँग्रेसची उमेदवारी चिंगळे यांना मिळणार, अशी चर्चा सुरु होती.

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आदल्‍या दिवशी बुडा अध्यक्ष निवड करून काँग्रेसने चिकोडी मतदारसंघात साखरपेरणी केल्याची चर्चा सुरू आहे.

बेळगाव : बेळगाव नगरविकास प्राधिकरण तथा ‘बुडा’ अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते लक्ष्मण चिंगळे (Laxman Chingale) यांची निवड झाली आहे. रात्री उशिरा याबाबतची प्रत उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ते आज कार्यभार घेण्याची शक्यता आहे. चिंगळे हे चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात.

चिकोडी लोकसभा मतदारसंघातून (Chikkodi Loksabha Constituency) काँग्रेसची उमेदवारी चिंगळे यांना मिळणार, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून सुरू होती. पालकमंत्री जारकीहोळी यांनीही याबाबत सूतोवाच केले होते. पण, गेल्या काही दिवसांपासून चिकोडीमधून जारकीहोळी यांची कन्या प्रियंका यांचे नाव पुढे आले आहे.

त्यामुळे चिंगळे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता त्यांची बुडा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांना चिकोडी येथून उमेदवारी मिळणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे. राज्यात काँगेस पक्षाचे सरकार सत्तेत येऊन एक वर्षाचा कालावधी लोटण्यास आला तरी बुडा अध्यक्ष निवड झाली नव्हती.

या पदासाठी बेळगावमधून अनेकजण इच्छुक होते. त्यांनी मोर्चेबांधणी ही केली होती. पण अखेर चिंगळे याना हे पद मिळाले आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आदल्‍या दिवशी बुडा अध्यक्ष निवड करून काँग्रेसने चिकोडी मतदारसंघात साखरपेरणी केल्याची चर्चा सुरू आहे. चिंगळे यांच्या माध्यमातून तब्बल एक वर्षानंतर बुडाला अध्यक्षपद मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

1 August 2026 Horoscope : मकर अन् मिथुन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली! पाहा 12 ही राशींचे आजचे भविष्य

Amit Shah Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अमित शाहंचा फोटो; 'भारताचा चाणक्य' म्हणून वादग्रस्त बॅनर?; काँग्रेसने विरोध करताच पोस्टर गायब

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो : अमित ठाकरे

दिल्लीच्या गाजलेल्या CJP आंदोलनावर येणार सिनेमा; पडद्यामागचं 'सत्य' उलगडणार?

SCROLL FOR NEXT