Satara Lok Sabha Constituency esakal
लोकसभा २०२४

सातारा काँग्रेसला सोडल्यास लढू; 'या' बड्या नेत्यानं दर्शवली लोकसभा लढवण्याची तयारी, महायुतीसमोर आव्हान!

सातारा मतदारसंघात (Satara Lok Sabha Constituency) उमेदवार कोण असावा, याबद्दल चर्चा सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

उमेदवारीबाबत शरद पवार यांनी निर्णय घ्यायचा आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी आज स्पष्ट केले आहे.

सातारा : सातारा मतदारसंघात (Satara Lok Sabha Constituency) उमेदवार कोण असावा, याबद्दल चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने (Congress) निवडणूक लढवावी, यासाठी राष्ट्रवादीकडून अद्यापपर्यंत प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास विचार करू, असे असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सातारा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले.

सातारा लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच श्री. चव्हाण यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असून, त्यांनी तुतारीबाबत निर्णय घ्यावा. काँग्रेसने या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यास विचार करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

कऱ्हाडमध्ये काल (रविवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड चर्चा केली होती. त्यानंतर चर्चेला उधाण येऊन साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा खासदार शरद पवार यांचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली.

यावर साताऱ्यातील काँग्रेस भवनात श्री. चव्हाण यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. महाविकास आघाडीच्या ४८ पैकी जवळ जवळ सर्व जागांवर एकमत झालं आहे. सातारा मतदारसंघात उमेदवार कोण असावा, याबद्दल चर्चा सुरू आहे. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे. यासंदर्भात माझी जयंत पाटील यांच्याबरोबर काल चर्चा झाली आहे. आता कोणता उमेदवार द्यायचा? हा निर्णय सर्वस्वी शरद पवार यांनी घ्यायचा आहे. ते जो उमेदवार देतील त्यांचे आम्ही पूर्ण ताकदीने काम करू.’’

पवारांच्या निर्णयाकडे लक्ष...

उमेदवारीबाबत शरद पवार यांनी निर्णय घ्यायचा आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी आज स्पष्ट केले आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा असून, याच पक्षाचा उमेदवार असेल, असे शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. शिवाय महाविकास आघाडीने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच सोडला असल्याने शरद पवार आता काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

हा निर्णय राष्ट्रवादीचा...

दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते, असे विचारले असता श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘हा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे. उमेदवारीच्या जर तरच्या प्रश्नावर मी बोलणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT