Prof. Madhu Dandavate esakal
लोकसभा २०२४

इंदिरा गांधींच्या लोकप्रियतेची प्रचंड लाट असतानाच क्रिकेट खेळण्यासाठी दंडवते मुंबईला गेले अन् लोकसभेत झाला पराभव!

इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) लोकप्रियतेची १९७१ च्या निवडणुकीवेळी प्रचंड लाट होती.

सकाळ डिजिटल टीम

'क्रिकेट आणि भौतिकशास्त्र ही दोन क्षेत्रे प्रा. मधू दंडवतेंची आवडती. या दोन्ही क्षेत्रांशी दंडवतेंचं आणखी एक रंजक नातं आहे.'

- सतीश पाटणकर

Rajapur Lok Sabha Election : इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) लोकप्रियतेची १९७१ च्या निवडणुकीवेळी प्रचंड लाट होती. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Elections) ती दिसली. काँग्रेसविरोधी (Congress) अनेक नेते पराभूत झाले. महाराष्ट्रात तेव्हा लोकसभेच्या ४५ जागा होत्या. त्यातील ४२ जागांवर इंदिरा काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. मात्र, नागपूर, पंढरपूर आणि राजापूर अशा तीन जागांवर काँग्रेस पराभूत झाली.

राजापूरमधून पराभूत होण्याचं एकमेव कारण म्हणजे ‘प्रा. मधू दंडवते.’ (Prof. Madhu Dandavate) क्रिकेट (Cricket) खेळण्यासाठी मुंबईत दाखल झालेला तरुण, भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, समाजवादी विचारांचा नेता, पाचवेळा खासदार, रेल्वेमंत्री, अर्थमंत्री, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, असा प्रा. मधू दंडवतेंचा प्रवास.

नगर येथील नगरपालिकेच्या शाळेत माध्यमिक शिक्षणानंतर मॅट्रिकच्या शिक्षणासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दाखल झाले. ते साल होतं १९४६ चं. तेव्हा भारतीय नाविक बंड सुरू होतं. मधू दंडवते त्या वेळी २२ वर्षांचे होते. रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे अतिशय हुशार विद्यार्थी. नगरला शालेय शिक्षणावेळी मधू दंडवते शाळेच्या क्रिकेट टीमचे कॅप्टन होते. उत्तम क्रिकेटपटू म्हणून नाव कमावता यावं, या उद्देशानं वडिलांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबईला पाठवलं होतं. मात्र, मुंबईच्या त्या वेळच्या ध्येयधुंद वातावरणात ते चळवळीत गुरफटले गेले.

याच शाळेत न्यायमूर्ती रानडे, रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, सेनापती बापट अशा दिग्गजांचं शिक्षण झालं होतं. कविता, नाटक यांसह क्रिकेटची आवड दंडवतेंना होती. ‘जीवनाशी संवाद’ या आत्मचरित्रात दंडवते सांगतात, ‘शालेय जीवनातच क्रिकेटचीही गोडी लागली. वडिलांनाही क्रिकेटची गोडी असल्यामुळे त्यांनी माझ्या क्रिकेटशौकास उत्तेजनच दिले. माझी क्रिकेटची आवड आणि खेळातील कौशल्य विकसित व्हावे, याकरिता पुढील शिक्षणासाठी मी मुंबईला जावे, असे माझ्या वडिलांचे मत पडले.’ क्रिकेटमधील आवड आणि वडिलांनी दिलेलं प्रोत्साहन, यांमुळे मधू दंडवते मुंबईत क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी आले.

अर्थात, शिक्षणाकडे त्यांना दुर्लक्ष करायचं नव्हतंच. भौतिकशास्त्र हा त्यांचा आवडता विषय होता. क्रिकेट आणि भौतिकशास्त्र ही दोन क्षेत्रे प्रा. मधू दंडवतेंची आवडती. या दोन्ही क्षेत्रांशी दंडवतेंचं आणखी एक रंजक नातं आहे, ते त्यांच्या दोन हुशार विद्यार्थ्यांमुळे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि ‘इस्रो’ या भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन हे दोघेही प्रा. मधू दंडवते यांचे विद्यार्थी.

पुढे, खासदार झाल्यावरही त्यांचं क्रिकेटचं प्रेम कमी झालं नाही. ‘जीवनाशी संवाद’मध्ये प्रा. दंडवते लिहितात, ‘क्रिकेट सामने खेळूनही मी काही बक्षिसे मिळवली. लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या क्रिकेट सामन्यांच्या काही मधुर आठवणी आहेत. लोकसभा क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचाही बहुमान मिळाला होता. विजेत्या लोकसभा संघाच्या यष्टीरक्षकासाठी ठेवलेली चांदीची ढाल भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मला त्या वेळी मिळाली होती.’

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT