cm arvind kejriwal  esakal
लोकसभा २०२४

CM Arvind Kejriwal : केजरीवाल सरकारचं काम कोठडीतूनही सुरु; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश

Arvind Kejriwal Arrest Updates : अबकारी कर गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर ईडीच्या कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी कोठडीतून पहिला आदेश जारी केला. केजरीवाल कोठडीतूनच सरकार चालवतील, असे आम आदमी पक्षाने याआधी स्पष्ट केले होते.

सकाळ वृत्तसेवा

Arvind Kejriwal Arrest Updates : अबकारी कर गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर ईडीच्या कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी कोठडीतून पहिला आदेश जारी केला. केजरीवाल कोठडीतूनच सरकार चालवतील, असे आम आदमी पक्षाने याआधी स्पष्ट केले होते.

दिल्लीच्या काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यावर तोडगा काढावा, असे आदेश केजरीवाल यांनी पाणीपुरवठा मंत्री आतिशी यांना दिले. यावर आतिशी यांनी पत्रकार परिषद आयोजित करत केजरीवाल यांना अटक झाली असली तरी दिल्लीकरांचे कोणतेही काम अडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. केजरीवाल यांनी दिल्लीच्या लोकांचे हित लक्षात घेऊन आदेश दिला. हा आदेश पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले, असेही त्या म्हणाल्या.

पाणी आणि स्वच्छतेसारख्या छोट्या-छोट्या गोष्टींबाबत कोणता मुख्यमंत्री विचार करू शकतो, असे सांगून आतिशी पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री केजरीवाल हे दोन कोटी दिल्लीकर लोकांना आपले कुटुंब मानतात. दिल्लीकरांसाठी केजरीवाल हे केवळ एक मुख्यमंत्री नाहीत तर ते त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. दरम्यान केजरीवाल यांच्या अटकेनंतर निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी आप नेत्यांनी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. पक्षाचे सचिव संदीप पाठक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

अबकारी कर प्रकरणातला आरोपी शरदचंद्र रेड्डी याला तपास संस्थांनी अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून रोख्यांच्या माध्यमातून 60 कोटी रुपये घेण्यात आले. नंतर हाच आरोपी माफीचा साक्षीदार बनला, असा आरोप आप नेते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान आम आदमी पक्षाकडून भाजपविरोधात तर भाजप कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरोधात आजही आंदोलन करण्यात आले. गैरव्यवहार प्रकरणात अटक झाल्यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT