Shirur Loksabha Constituency  sakal
लोकसभा २०२४

Shirur Loksabha Constituency : ‘बदला’ घेणे हाच उद्देश ; शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा आरोप

‘शिवाजीराव आढळराव पाटील हे २०१९ चा बदला घेण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरत आहेत. त्यांचा अजेंडा हा मतदारसंघाचा विकास नव्हे, तर केवळ ‘बदला’ घेणे एवढाच आहे,’

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : ‘‘शिवाजीराव आढळराव पाटील हे २०१९ चा बदला घेण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरत आहेत. त्यांचा अजेंडा हा मतदारसंघाचा विकास नव्हे, तर केवळ ‘बदला’ घेणे एवढाच आहे,’ असा आरोप शिरूर मतदारसंघाचे आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. डॉ. कोल्हे यांनी शनिवारी दिवसभर वाघोलीमध्ये आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क साधला. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी आमदार अशोक पवार, बाळासाहेब सातव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. कोल्हे म्हणाले की, शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे व महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी मी उभा आहे. यामुळे ही लढत ‘बदला’विरुद्ध महाराष्ट्राची अस्मिता अशी आहे.

आढळराव यांची उमेदवारी अद्याप अंतिम झालेली नाही. दिल्लीतून त्यांना हिरवा झेंडा मिळाला नसावा, मात्र त्यापूर्वीच ते ‘बदला’ घेण्याची भाषा करीत आहेत. ही आश्चर्याची बाब आहे. शेतकरी व अनेक प्रश्नांवर भाजपचे सर्वच खासदार संसदेत कधीच बोलत नाहीत. त्यांनी केवळ मोदींचा जयजयकार केला. मी मात्र शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला. अनेक मोठी कामे मार्गी लावली. यापुढे मतदार संघात जी कामे मार्गी लावली ती प्राधान्याने पूर्ण करणे. पुणे नगर रस्ता, नाशिक रस्ता, इंद्रायणी मेडीसीटी प्रकल्प पूर्ण करून घेणे, अशा अनेक कामाना प्राधान्य देणे हा माझा प्रथम अजेंडा आहे.

महाराष्ट्रातील जनता अतिशय सुज्ञ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सूडबुद्धीनेच कारवाई झाल्याचा आरोप करून डॉ. कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रात जे राजकारण सध्या सुरू आहे, ते अतिशय वाईट आहे; मात्र महाराष्ट्रातील जनता अतिशय सुज्ञ आहे. ती गद्दारांना नक्कीच धडा शिकवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanpur Mishri Bazaar blast : कानपूरच्या मिश्री बाजारात मशिदीजवळ भीषण धमाका; दोन स्कुटरमध्ये झालेल्या स्फोटात सहा जण गंभीर जखमी

Dilip Khedkar यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीत राज्यातील उमेदवारांसोबत दुजाभाव; भरती प्रक्रियेतील शैक्षणिक अर्हतेसाठी दिले कमी गुण

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT