Loksabha Election Result sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election Result : शेतकऱ्यांनी दिला भाजपला दे धक्का!

नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीला ४, तर भाजपप्रणित ‘एनडीए’ भाजपला २ जागा मिळाल्या आहेत.

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीला ४, तर भाजपप्रणित ‘एनडीए’ भाजपला २ जागा मिळाल्या आहेत. यात सर्वांत चुरशीचा आणि उत्कंठावर्धक सामना धुळ्यात झाला. नाशिकमध्ये विद्यमान खासदाराबद्दलची नाराजी, दिंडोरीत शेतकऱ्यांचा रोष, धुळ्यात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण, नंदुरबारमध्ये गावित कुटुंबाबद्दलची अनास्था, जळगावमध्ये स्मिता वाघ यांना सहानुभूती आणि रावेरमध्ये रक्षा खडसे यांचे खणखणीत नाणे हे मुद्दे टर्निंग पॉइंट ठरले.

महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचा मोठा पराभव केला. या पराभवामागे गोडसे यांच्या संदर्भातील सर्व स्तरातील नाराजी हा मोठा फॅक्टर ठरला. पहिल्या फेरीपासून राजाभाऊ वाजे यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. भाजप लोकसभेच्या निवडणुकीत सक्रिय नसणे, हे देखील गोडसे यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. गिरीश महाजन यांच्यासारखे भक्कम नेतृत्व महायुतीला यावेळी पूर्ण क्षमतेने लाभले नाही.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना भोवली आहे. कोरी पाटी असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या भास्कर भगरे यांनी भारती पवार यांचा पराभव केला. भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सभेचाही उपयोग झाला नाही. धुळे मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. मुस्लिम मतांची मिळालेली एकतर्फी साथ ही डॉ. बच्छाव यांच्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. शेतकऱ्यांमधील असंतोष आणि मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा फटका भामरे यांना बसला.

धुळ्यात दोन टर्म खासदार असलेल्या भाजपच्या हिना गावित यांचा काँग्रेसचे युवा आणि नवखे उमेदवार गोवाल पाडवी यांचा मोठा पराभव केला आहे. गोवाल यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. गावित कुटुंबावरील नाराजीचा फटका हिना गावित यांना बसला आहे.

जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांनी महाआघाडीचे करण पवार यांचा पराभव केला. या विजयामुळे उन्मेष पाटील यांच्या बंडखोरीचा परिणाम भाजपच्या जळगाव जिल्ह्यातील समीकरणांवर झालेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. स्मिता वाघ यांना २०१९ मध्येही तिकीट जाहीर होऊन नंतर ते काढून घेण्यात आले होते. अभाविपच्या केडरमधील कार्यकर्त्या असलेल्या स्मिता वाघ यांनी ठेवलेल्या संयमाचे फळ त्यांना २०२४ मध्ये मिळाले.

रक्षा खडसेंचा बोलबाला...

भाजपच्या रक्षा खडसे या रावेरमधून तिसऱ्यांदा विजयी झाल्या. उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेले श्रीराम पाटील यांचा त्यांनी पराभव केला. एकनाथ खडसे यांचे रावेरमधील वर्चस्व अधोरेखित झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Video: ''तो मला पाहतोय.. माझ्या घराकडेच निघालाय!'', जुन्नरमध्ये बिबट्याचा थरार, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : युवा संघर्ष संघटनेचे कार्यकर्ते आणि महिला रहिवाशांचे आमरण उपोषण

Sindhudurg Weather : ऐन हिवाळ्यात वाढला उकाडा आणि दाटले ढग; अवकाळी पावसाच्या भीतीने देवगडातील आंबा बागायतदारांची घालमेल पुन्हा वाढली

Mumbai Crime: साईबाबा भंडाऱ्यात सन्मान न मिळाला नाही, शिवसेनेचा पदाधिकारी चिडला, तरुणावर जीवघेणा हल्ला अन्...; काय घडलं?

Sindhudurg News : धामणी धरणातील पिंजरा मत्स्यपालन अंतिम टप्प्यात मत्स्यउत्पादन वाढीने प्रशासनाचा आत्मविश्वास उंचावला

SCROLL FOR NEXT