Hatkanangale Lok Sabha Nitin Gadkari esakal
लोकसभा २०२४

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

जनतेच्या भविष्याचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद नरेंद्र मोदी सरकारमध्येच आहे.

सकाळ डिजिटल टीम

'देशाला सुखी, संपन्न, समृद्ध, आत्मनिर्भर आणि अर्थ व्यवस्था बळकट करून देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न आहे.’

हुपरी : यंदाची लोकसभा निवडणूक ही उमेदवारांचा नाही, तर ती देशातील जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा निर्णय करणारी आहे. जनतेच्या भविष्याचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद नरेंद्र मोदी सरकारमध्येच आहे. त्यासाठीच भाजप महायुतीला आशीर्वाद द्या. जनतेचे जीवनमान बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी येथे केले.

हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ येथे हुतात्मा स्मारक मैदानावर आयोजित महाविजय सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेश हाळवणकर होते. नितीन गडकरी म्हणाले, ‘गेल्या साठ वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही या भागात केली आहेत. याचे श्रेय मोदी किंवा गडकरींना नाही, तर योग्य सरकारची निवड केली त्या जनतेला आहे. देशाला सुखी, संपन्न, समृद्ध, आत्मनिर्भर आणि अर्थ व्यवस्था बळकट करून देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न आहे.’

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, आता कोणीही चिंता करण्याची गरज नाही. जो काही गोंधळ निर्माण झाला होता तो दूर झाला असून, हुपरी भागातील तेरा गावांतून उमेदवारांना मिळणाऱ्या एकूण मतदानांपैकी साठ टक्के अधिक मते धैर्यशील माने यांना देणार आहे. यावेळी श्री. हाळवणकर, डॉ. विनय कोरे, डॉ. अनिल बोंडे, जयदीप कवाडे, जयश्री गाट, ऋषभ जैन, शिवाजी जाधव, सुभाष कागले, अजित सुतार, मंगलराव माळगे, अशोकराव माने, अमित गाट आदींची मनोगते झाली. उमेदवार धैर्यशील माने, पुंडलिकराव जाधव, हिंदुराव शेळके, महावीर गाट, अण्णासाहेब शेंडूरे, ‘गोकुळ’चे संचालक मुरलीधर जाधव, अरुण इंगवले, रजनीताई मगदूम, अजितसिंह मोहिते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT