Esakal
लोकसभा २०२४

Modi 3.0: "जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले तर मी टक्कल करेन"; AAP च्या उमेदवाराचं आव्हान

चार जून रोजी एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरतील असंही या नेत्यानं म्हटलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपला सुमारे ३६० ते ३७५ जागा मिळतील असा अंदाज विविध पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. पण चार जून रोजी प्रत्यक्ष निकालादिवशी हे सर्व अंदाज चुकीचे ठरतील असा विश्वास दिल्लीतील आपचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी व्यक्त केला आहे. तसेच जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले तर मी टक्कल करेन, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सोमनाथ भारती यांनी ट्विट करताना म्हटलं की, "जर तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान बनले तर मी टक्कल करेन, माझे शब्द लिहून घ्या. इंडिया आघाडी सर्व सात जागांवर जिंकेन, त्यामुळं आपल्याला चार जून रोजी येणाऱ्या निकालांची प्रतीक्षा करायला हवी. जनतेनं भाजपविरोधात मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आहे. त्यामुळं मोदींची भीती असल्यानं एक्झिट पोल्समधूनही त्यांना हारण्याची परवानगी देत नाहीत"

सोमनाथ भारती हे नवी दिल्लीच्या जागेवरुन लढत आहेत. त्यांची टक्कर भाजपचे उमेदवार बांसुरी स्वराज यांच्याशी होत आहे. बांसुरी या माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत. भाजपनं त्यांना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

यंदा आम आदमी पार्टीनं दिल्लीच्या चार जागांवर निवडणूक लढवली होती. तर काँग्रेसनं तीन जागांवर आपले उमेदवार दिले. ज्या जांगावर आपनं उमेदवार दिले तिथं पूर्व दिल्ली, नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि दक्षिण दिल्ली या जागांचा समावेश आहे. तर काँग्रेसनं चांदणी चौक, उत्तर पश्चिम दिल्ली आणि उत्तर पूर्व दिल्ली या जागा लढवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

SCROLL FOR NEXT