Satara Lok Sabha BJP candidate Udayanraje Bhosale esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : मोठ्या लग्नाच्या यादीला वेळ जातोच ना! लोकसभा उमेदवारीवरुन उदयनराजेंची मार्मिक टिप्पणी

सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर नाही.

हेमंत पवार

सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर नाही. त्यातच उदयनराजे यांनी भाजपचे उमेदवार म्हणून जोरदार तयारी सुरू केली आहे.

कऱ्हाड : लोकसभा (Satara Lok Sabha) निवडणुकीच्या उमेदवारीच्या भाजपच्या तीन याद्या जाहीर झाल्या. मात्र, त्यात उदयनराजे भोसलेंची (Udayanraje Bhosale) भाजपकडून उमेदवारी (BJP Candidate) जाहीर झाली नाही. त्यावर उदयनराजे यांनी येथे मार्मिक टिप्पणी केली.

याद्या, लग्नातही (Marriage) आपण याद्या करतोच ना. ही यादी, ती यादी. ज्यावेळी मोठं लग्न असते, त्यावेळी यादीला बरंच काही असतेच ना? त्यात हे पाहिजे, ते पाहिजे, हे नको, ते नको. मोठ्या लग्नाला मोठी यादी असते आणि त्यात वेळ जातोच ना! अशी टिप्पण्णी उदयनराजे यांनी केली.

Satara Lok Sabha BJP candidate Udayanraje Bhosale

सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर नाही. त्यातच उदयनराजे यांनी भाजपचे उमेदवार म्हणून जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांत भेटीगाठी, मेळावे यासाठी ते हजेरी लावत आहेत. त्याअंतर्गत उदयनराजे आज कऱ्हाड तालुक्यातील मेळाव्यासाठी येथे आले होते. त्याचदरम्यान त्यांनी प्रीतिसंगमावर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधिस्थळी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, हणमंत पवार, एकनाथ बागडी, सुदर्शन पाटसकर आदी उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होतेच. मात्र, त्यांनी देशाचेही नेतृत्व केले. ते देशाचे उपपंतप्रधान होते. त्यांच्या समाधीला अभिवादन करणे हे माझे कर्तव्य समजून आलो. यशवंतराव चव्हाण जेव्हा आमच्या आजी राजमाता सुमित्राराजे भोसले, वडिलांना भेटायला यायचे, तेव्हा त्यांना जवळून पाहण्याचा योग आला. एखादा माणूस जेव्हा योग्य दिशेने वाटचाल करत असेल, त्या वेळी आमच्या घराण्याने त्यांना पाठबळ दिले आहे. त्यांच्याबरोबर ते कायम राहिले आहेत. त्यांच्या विचारातून दिशा मिळते. लोकांच्या हितासाठी त्यांनी काम केले.’’

भाजपच्या तीन याद्या जाहीर झाल्या. मात्र, तुम्हाला भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली नसल्याच्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ‘‘लग्नातही आपण याद्या करतोच ना. ही यादी, ती यादी. ज्या वेळी मोठं लग्न असते, त्या वेळी यादीला बरंच काही असतेच ना? त्याच्यात हे पाहिजे, ते पाहिजे, हे नको, ते नको. मोठ्या लग्नाला मोठी यादी असते आणि त्यात वेळ जातोच ना!’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गोळीबारावरून सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांनी शहराचे पालकत्व घ्यावे!

Space Mission: भारताने इतिहास घडविल्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर अवकाशात

ट्रम्प यांचा भारताला पुन्हा दणका? २५ टक्के टॅरिफ लावण्याच्या हालचाली; आणखी ६ देश रडारवर

SCROLL FOR NEXT