Chandrakant Patil sakal
लोकसभा २०२४

Chandrakant Patil : महायुतीसाठी निवडणूक मताधिक्याची

भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे राज्याच्या पातळीवर काम करतात. पुण्यातील आमदार म्हणून पुणे जिल्हा, मूळचे कोल्हापूरचे म्हणून कोल्हापूर जिल्हा आणि पालकमंत्री म्हणून सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

सकाळ वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे राज्याच्या पातळीवर काम करतात. पुण्यातील आमदार म्हणून पुणे जिल्हा, मूळचे कोल्हापूरचे म्हणून कोल्हापूर जिल्हा आणि पालकमंत्री म्हणून सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.

विजय चोरमारे

भाजप आणि महायुतीची महाराष्ट्रातील स्थिती कशी आहे?

पक्षाचा नेता म्हणून सांगत नाही, पण प्रशांत किशोर म्हणाले होते की, २०२४ ला विरोधकांनी गॅप घ्यायला पाहिजे होता. कारण मोदीजींची लोकप्रियता शिखरावर आहे. मध्यमवर्ग, उच्चवर्ग तर मोदींच्या कामावर खूश आहेच पण गरीब माणूस प्रचंड समाधानी आहे. कारण असा एकही घटक नाही ज्याला मोदीजींच्या योजनेचा लाभ झालेला नाही. आता काँग्रेसला सत्तर वर्षांत हे करायला काहीच अडचण नव्हती. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेही महिला, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य योजना अशा अनेक सवलती देवून सर्वसामान्य लोकांचे जगणे सुसह्य केले. आम्ही महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ म्हणतो ते या बळावर. आतापर्यंत नरेंद्र मोदींच्या नऊ सभा झाल्या. या सभांनी सगळे गणित बदलून टाकले आहे.

पण तुमच्या जागा अडचणीत असल्यामुळे पंतप्रधानांना एवढ्या सभा घ्याव्या लागल्या असे म्हणतात…

- २०१९ ला एवढे प्रमाण नसले तरी २०१४ ला त्यांनी अशाच सभा घेतल्या होत्या. मोदीजी प्रथमपुरूषी विचार करणारे नेते आहेत. ते इतरांना सांगतात कष्ट करा तेव्हा ते स्वतः अमाप कष्ट करुन उदाहरण घालून देतात. यावेळी शपथ घेतल्यानंतर शंभर दिवसांत काय करायचे याचा त्यांचा आराखडा तयार आहे, यावरून लक्षात घेता येईल.

महायुतीत मतभेद असल्यामुळे अखेरच्या घटकेपर्यंत उमेदवार ठरत नव्हते का?

- मतभेदाचा मुद्दाच नव्हता. समोरचा उमेदवार कोण आहे याचा अंदाज घेण्यासाठी काही ठिकाणी मुद्दाम विलंब लावला. कुणाला उमेदवारी दिल्यावर मतांचे अंतर वाढेल हा विचार होता. तसेही आताच्या निवडणुकीत आमच्यासाठी जिंकणे हा विषयच नाही. आम्ही जिंकणारच आहोत. आमच्यादृष्टीने ही निवडणूक मताधिक्क्याची आहे.

एकीकडे निवडणूक मताधिक्क्याची म्हणता, दुसरीकडे माढ्याची जागा अडचणीत आहे म्हणता.

- जेव्हा कार्यकर्त्यांना घेऊन बसतो तेव्हा त्यांना गतीने कामाला लावण्यासाठी काही गोष्टी बोलाव्या लागतात. त्यादिवशी मंगळवेढा येथे मंत्री तानाजीराव सावंत यांचे बंधू शिवाजीराव यांना वेगाने कामाला लावण्यासाठी मी ते वक्तव्य केले होते. माढा आमच्यासाठी कठीण कधीच नव्हती. उलट टप्प्याटप्प्याने अधिक सोपी होत गेली.

बारामतीमध्ये शरद पवार यांना पराभूत करणे हेच ध्येय असल्याचे वक्तव्यही तुम्ही केले होते…

- त्याही विधानावरून गैरसमज पसरवण्यात आला. शरद पवार यांच्या बांधाशेजारी माझा बांध नाही. राजकीय शत्रुत्वही नाही. बारामतीमध्ये आमचे परंपरागत पाच लाखाहून अधिक मतदार आहेत. कमळ चिन्ह नसल्यामुळे त्यांना घड्याळ चिन्हाचे बटण दाबताना मनात किंतू नको म्हणून त्यांच्यासाठी मी ते विधान केले. त्याचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा तुम्हाला फटका बसेल असे वाटते का ?

- तुम्ही म्हणता तशी सहानुभूती सवसामान्यांमध्ये नाही. सहानुभूती त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ती काही प्रमाणात दिसत होती, ती मोदींजींच्या सभांमुळे खाली बसली.

मराठा समाजाच्या आंदोलनाचा महायुतीला काही फटका बसेल असे वाटते का ?

- मराठा समाजाची भूमिका समजून घेतली तर याचे उत्तर मिळते. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले. हायकोर्टाने टिकवले. ते उद्धव ठाकरेंच्या काळात गेले. ते पुन्हा एकनाथ शिंदे यांनी दिले. हा सगळा क्रम लक्षात घेवून मराठा समाज मतदान करेल याची मला खात्री आहे. ओबीसीमध्ये घाला म्हणता, तर मग शरद पवारांनी १९९२ ला का घातले नाही? अशा खूप गोष्टी सांगता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी ‘ही’ पंचसूत्री लक्षात ठेवाच! अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर रिकामे होईल बॅंक खाते; सोलापूर शहर सायबर पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT