jammu kashmir baramulla lok sabha terrorist attack one killed two injured before voting Sakal
लोकसभा २०२४

मतदानाआधी काश्‍मीर हादरले; दहशतवाद्यांच्या दोन हल्ल्यांत एकाचा मृत्यू, दोघे जखमी

अनंतनागमधील पहलगाम येथे सध्या पर्यटक मोठ्या संख्येने आलेले आहेत. दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास यन्नार भागात बेछूट गोळीबार केला.

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात उद्या (सोमवार) मतदानाबाबत उत्सुकता असतानाच अनंतनाग आणि शोपियाँ या जिल्ह्यांत दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शोपियाँमधील हल्ल्यात भाजपचे कार्यकर्ते आणि माजी सरपंचाचा मृत्यू झाला, तर अनंतनागमधील पहलगाम येथे पर्यटनस्थळावर झालेल्या गोळीबारात एक दाम्पत्य जखमी झाले.

अनंतनागमधील पहलगाम येथे सध्या पर्यटक मोठ्या संख्येने आलेले आहेत. दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास यन्नार भागात बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात तबरेज आणि फराह हे दाम्पत्य जखमी झाले.

हे दोघे राजस्थानमधील जयपूर येथे राहणारे असून काश्‍मीरमध्ये फिरण्यासाठी आले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी तातडीने या भागाचा ताबा घेत नाकेबंदी सुरू केली.

या घटनेबाबत पुरेशी माहिती गोळा केली जात असतानाच अर्ध्या तासांतच शोपियाँ जिल्ह्यातील हिरपोरा भागात दहशतवाद्यांनी भाजपचे नेते एझाज शेख यांची गोळ्या झाडून हत्या केली. शेख हे माजी सरपंच होते. गोळीबारात शेख हे गंभीर जखमी झाले. तातडीने रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गोळीबारानंतर सुरक्षा जवानांनी परिसराची नाकेबंदी करत शोध मोहीम सुरू केली आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील बारामुल्ला मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. पुढील टप्प्यात (२५ मे) अनंतनाग-राजौरीमध्ये मतदान होत आहे. अनंतनागमध्ये ७ मे रोजीच मतदान होणार होते. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे हे मतदान पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले. दहशतवाद्यांच्या हालचाली हे देखील यामागील कारण असल्याची चर्चा रंगली होती.

राजकीय पक्षांकडून निषेध

  • मेहबूबा मुफ्ती (पीडीपी) : मतदानाच्या काही दिवस आधीच हल्ला होणे, ही चिंतेची बाब आहे.

  • उमर अब्दुल्ला (एनसी) : जम्मू-काश्‍मीरमधील शांततेच्या मार्गात अद्यापही अनेक अडथळे आहेत. सर्वांनी ठाम राहून शांततेसाठी प्रयत्न करावेत.

भाजपच्या कार्यकर्त्याला दहशतवाद्यांनी मारले की स्थानिक असलेल्या कोणीतरी, याचा तपास करावा लागेल. दहशतवाद येथे अद्यापही शिल्लक आहे आणि ते लोकांवर हल्ले करत आहेत, हे यातून सिद्ध झाले आहे.

- फारुख अब्दुल्ला, अध्यक्ष, नॅशनल कॉन्फरन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT