Jyoti Mete
Jyoti Mete 
लोकसभा २०२४

Jyoti Mete: ज्योती मेटेंची बीडमधून लोकसभेची उमेदवारी निश्चित? शरद पवारांच्या भेटीनंतर सांगितलं लवकर अंतिम निर्णय

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या उमेदवारीबाबत काही स्पष्टपणे सांगितलं नाही पण लवकर याबाबत अंतिम निर्णय जाहीर होईल असं सूचकपणे म्हटलं आहे. त्यामुळं ज्योती मेटेंची बीडमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. (Jyoti Mete may Lok Sabha candidature from Beed confirmed from ncp sharad pawar final decision will be announced soon)

पवारांच्या भटीनंतर काय म्हणाल्या ज्योती मेटे?

ज्योती मेटे म्हणाल्या, सक्रीय राजकारणात पाऊल ठेवणार असल्यानं मी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे. त्यासाठी शरद पवारांची आज भेट घेतली या भेटीत माझ्या राजकारणात सक्रीय होण्याबाबत प्रामुख्यानं चर्चा झाली. (Marathi Tajya Batmya)

बीडच्या जागेबाबत लवकरच अंतिम निर्णय

बीडमध्ये आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर ज्योती मेटे म्हणाल्या, पण बीडच्या जागेबाबत लवकरच अंतिम निर्णय होईल. इथं उमेदवारीसाठी दबावंत्राचा वापर करण्याचा प्रश्नच येत नाही, असं ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

पंकजा मुंडेंना देणार आव्हान?

बीडमधून भाजपनं प्रितम मुंडे यांना उमेदवारी नाकारत त्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं जर या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ज्योती मेटे यांना बीडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर पंकजा मुंडे आणि ज्योती मेटा असा प्रमुख सामना होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT