Kolhapur Constituency Lok Sabha Election Result:  esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : 'या' प्रमुख नेत्यांच्या गावांतच मंडलिक पिछाडीवर; कारखाना संचालकांच्या गावांतही मताधिक्य नाही

एकट्या कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांना लाखाच्या असपास मताधिक्य मिळेल, असा अंदाज बांधला जात होता.

सकाळ डिजिटल टीम

प्रा. मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय प्रमुख नेत्यांच्या गावांतील मतदानाच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता नेत्यांच्या गावांतच त्यांना कमी मते मिळाली आहेत.

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीत (Kolhapur Lok Sabha Elections) महायुतीच्या प्रचारात सक्रिय असलेल्या कागल तालुक्यातील नेत्यांच्या गावातच महायुतीचे (Mahayuti) उमेदवार प्रा. संजय मंडलिक पिछाडीवर आहेत. प्रा. मंडलिक यांच्या हमीदवाडा साखर कारखाना संचालकांच्या गावांतही त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळालेले नाही. याउलट अशा गावांत काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे.

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि प्रा. मंडलिक (Sanjay Mandlik) यांना उमेदवारी मिळाल्यानंतर एकट्या कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांना लाखाच्या असपास मताधिक्य मिळेल, असा अंदाज बांधला जात होता. निकालात मात्र हा अंदाज फोल ठरल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून या मतदारसंघात प्रा. मंडलिक यांचे काम कोणी केले, कोणी त्यांना फसवले यावरून समाज माध्यमांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर या मतदारसंघातील प्रा. मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय प्रमुख नेत्यांच्या गावांतील मतदानाच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता नेत्यांच्या गावांतच त्यांना कमी मते मिळाली आहेत. एवढेच नाही तर प्रा. मंडलिक प्रतिनिधित्व करीत असलेल्या हमीदवाडा साखर कारखान्याच्या (Hamidwada Sugar Factory) संचालकांच्या गावांतही त्यांना अपेक्षित मते मिळाली नसल्याचे दिसते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक असलेले ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, शाहू कारखान्याचे संचालक तुकाराम अर्जुन पाटील, मंडलिक कारखान्याचे एक माजी संचालक असलेल्या मौजे सांगावमध्ये शाहू महाराजांना दोन केंद्रांवर मताधिक्य आहे. श्री. मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे गटाचे वर्चस्व असलेल्या कागल शहरात प्रा. मंडलिक यांना केवळ २४०० मतांची आघाडी आहे. शहरातील काही केंद्रांवर प्रा. मंडलिक पिछाडीवर आहेत.

मुश्रीफ गटाचे बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील, निवास पाटील यांच्या बाचणीत, बाजार समिती संचालक बाबासाहेब पाटील यांच्या वंदूरमध्‍ये, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांच्या बामणीत, मंडलिक कारखान्याचे संचालक के. डी. शिंदे यांच्या कौलगेत, याच कारखान्याचे संचालक विनायक तुफान यांच्या चिखलीत एवढेच नव्हे तर गेली अनेक वर्षे कै. सदाशिवराव मंडलिक व आता प्रा. मंडलिक यांच्याकडे पीए म्हणून काम करीत असलेल्या अमर पाटोळे यांच्या एकोंडी गावातही शाहू महाराजांना मताधिक्य आहे. प्रा. मंडलिक यांचा बालेकिल्ला असलेल्या मुरगूड शहरातही दोन केंद्रांवर शाहू महाराज आघाडीवर आहेत. याशिवाय बोरवडे, निढोरी, सेनापती कापशी व अन्य नेत्यांच्या गावांतही कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे.

काही नेत्यांच्या गावातील मताधिक्य

गावाचे नाव नेत्यांचे नांव मताधिक्य किती? मताधिक्य कोणाला?

  • कसबा सांगाव कैलास जाधव- संचालक मंडलिक कारखाना १०२७ शाहू महाराज

  • मौजे सांगाव युवराज पाटील, तुकाराम पाटील १२५४ प्रा. मंडलिक

  • वंदूर बाबासाहेब पाटील-मंडलिक गट ५०३ शाहू महाराज

  • बामणी एम. पी. पाटील-राजे बँक ३८ शाहू महाराज

  • बाचणी सूर्यकांत पाटील, निवास पाटील १८४ शाहू महाराज

  • कौलगे के. डी. शिंदे-संचालक मंडलिक कारखाना १०२ शाहू महाराज

  • चिखली विनायक तुफान-संचालक मंडलिक कारखाना २२ शाहू महाराज

  • कापशी प्रदीप चव्हाण-संचालक मंडलिक कारखाना १२७ प्रा. मंडलिक

  • एकोंडी अमर पाटोळे- मंडलिक पीए १०० शाहू महाराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT