Latur Loksabha Election Result  sakal
लोकसभा २०२४

Latur Loksabha Election Result : लातूरमध्ये काँग्रेसचा झेंडा डॉ. काळगे विजयी ; भाजपच्या शृंगारेंचा पराभव

लोकसभेच्या लातूर मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा एकदा आपला झेंडा फडकावला आहे. काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचा ६१ हजार ८८१ मताधिक्य घेत पराभव केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : लोकसभेच्या लातूर मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा एकदा आपला झेंडा फडकावला आहे. काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचा ६१ हजार ८८१ मताधिक्य घेत पराभव केला आहे.

लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पण, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघावर वर्चस्व मिळविले होते.

पण, या निवडणुकीत काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी ही जागा पुन्हा खेचून आणली आहे.

या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे व काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांच्यात चुरसीची लढत झाली होती. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

त्यामुळे काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाचीच कसोटी होती.

गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाने ‘कमळ’ फुलविले होते. पण, या निवडणुकीत मात्र लातूर हा काँग्रेसाचाच बालेकिल्ला आहे, हे देशमुख यांनी दाखवून दिले आहे. यात काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांनी भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे यांचा पराभव केला आहे.

-काळगेंना सर्वच फेऱ्यांत आघाडी-

या मतदारसंघात २८ ईव्हीएम मशीनच्या, तर एक टपाली मतदानाची फेरी झाली. यापैकी एक फेरी वगळता सर्वच फेऱ्यांमध्ये डॉ. काळगे यांना मतांची आघाडी राहिली आहे.

डॉ. काळगे यांना सहा लाख ९ हजार २१ मते मिळाली, तर शृंगारे यांना पाच लाख ४७ हजार १४० मते मिळाली आहेत. डॉ. काळगे हे ६१ हजार ८८१ मताधिक्य घेत विजयी झाले आहेत. या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

लातूरसह मराठवाडा, राज्य आणि देशातील जनतेने निर्भय बनून महाविकास आघाडीला (इंडिया) पाठिंबा दिला. लातूरमध्ये डॉ. शिवाजी काळगे यांचा विजय हा आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा, एकजुटीचा आहे.

महागाई, बेरोजगारी, शेती मालाचे पडलेले भाव हे सामान्यांना भेडसावणारे मुद्दे चर्चेत आणून जनतेला आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले. त्यामुळे महाविकास आघाडीला जनतेचा कौल मिळाला.

- अमित देशमुख, काँग्रेस नेते, लातूर

लातूरला काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे बहुमताने निवडून आले. लोकसभेत आपल्या विचारांचा, पक्षाचा उमेदवार नसल्यानेच गेली १० वर्षे लातूरचे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारात अडकले होते. पण, आता लातूरच्या प्रगतीला पुन्हा एकदा चालना मिळेल, येथील विकासाचा वारसा जपला जाईल, याचा विश्वास आहे.

- धीरज देशमुख, आमदार

मराठा आरक्षणक्षाचा विषय सकारात्मक पद्धतीने मतदारांपर्यंत घेऊन जाण्यात, तसेच शेतमालाच्या भावाबाबत शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यात आम्ही कमी पडलो. काँग्रेसने प्रचारादरम्यान भाजप संविधान बदलणार, अशी व्यापक चर्चा घडवून आणली, ती आम्ही खोडून काढू शकलो नाही. पण, नव्या जिद्दीने जनतेचा विश्वास आम्ही पुन्हा मिळवू. लातूरच्या विकासाचा विषय येईल तेव्हा डॉ. काळगे यांना पाठिंबा देऊ.

- संभाजी पाटील-निलंगेकर, भाजप नेते, लातूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT