Lok Sabha Election 2024 Sharad Pawar esakal
लोकसभा २०२४

पहिल्या तीन टप्प्यांनी मोदींना अस्वस्थ केलंय, राज्यात 'महाविकास'ला 30 ते 35 जागा मिळणार; शरद पवारांना विश्वास

महाराष्ट्रात मागील वेळी आम्हा विरोधी पक्षाला लोकसभेच्या सहा जागा मिळाल्या होत्या.

सकाळ डिजिटल टीम

''लोकसभा निवडणुकीचे पहिल्या तीन टप्प्यांनी मोदींना (Narendra Modi) अस्वस्थ केले असून, आता त्यांचा टोन बदलला आहे.''

सातारा : महाराष्ट्रात मागील वेळी आम्हा विरोधी पक्षाला लोकसभेच्या सहा जागा मिळाल्या होत्या. आता यावेळेस लोकांना बदल पाहिजे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सर्व मिळून ३० ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे. लोक काँग्रेस, राष्ट्रवादीचा विचाराबरोबरच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाला समर्थन देत आहेत, अशी स्पष्टोक्ती खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी साताऱ्यात दिली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे पहिल्या तीन टप्प्यांनी मोदींना (Narendra Modi) अस्वस्थ केले असून, आता त्यांचा टोन बदलला आहे. धर्मांधवादी विचारांना घेऊनच काहीतरी बदल होईल, असे त्यांना वाटत असावे, असेही श्री. पवार म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी खासदार शरद पवार साताऱ्यात आले होते.

रयत शिक्षण संस्थेतील कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. महाराष्ट्रातील चित्र काय असेल, यावर पवार म्हणाले, ‘‘मागील निवडणुकीत आम्हा विरोधी पक्षाला सहा जागा मिळाल्या होत्या. यावेळेस मात्र, महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या ३० ते ३५ च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. लोकांना बदल हवा आहे.’’

पवार म्हणाले, ‘‘अदानी व अंबानी हे कोणाचे दोस्त आहेत याची चर्चा देशात आहे. आता मोदी काँग्रेसवर घसरू लागले आहेत. पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील, असे भाकीत शरद पवार यांनी एका मुलाखतीत केले होते. यावरून त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का, असे विचारले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, असे सांगून ते म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र काम करत आहेत. हळूहळू अधिक एकत्र येऊन काम करावे, असे ठरलं तर आश्चर्य वाटायला नको.’’

अजित पवारांना फटकारले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार स्वत:च सर्व निर्णय घेतात; पण ते हा निर्णय पक्षाने घेतल्याचे दाखवतात, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, की त्यांनी त्यांचा पक्ष नीट चालवावा. दुसऱ्याच्या पक्षात कशाला तोंड घालता, असा फटकारा त्यांनी लगावला.

कार्यकर्त्यांना आनंद वाटतो

सुप्रिया सुळे यांचे पुण्यात फटाक्याच्या आतषबाजीत व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यातून त्यांच्या विजयाचा आत्मविश्वास वाढला आहे का, या प्रश्नावर श्री. पवार यांनी असा काही संबंध नाही. कार्यकर्त्यांना तसे वाटत असेल, तर आनंद आहे, असे सांगितले. दरम्यान, त्यांनी सातारा व बारामती लोकसभेच्या निकालाबाबत भाष्य करणे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT