Lok Sabha Election 2024-percent voting  esakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024: पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान, महाराष्ट्रासह 'या' राज्यांची टक्केवारी किती?

Lok Sabha Election 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाने सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर केली असून यात ६०.०३ टक्के मतदान झाल्याचे म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: देशातील २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज शांततेमध्ये मतदान पार पडले. तब्बल ६० टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. पश्चिम बंगाल, छत्तीसगड या दोन राज्यांतील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेमध्ये ही प्रक्रिया पार पडली. बंगालमधील हिंसाचारामध्ये २५ पेक्षाही अधिक लोक जखमी झाल्याचे कळते. Lok Sabha Election 2024

उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर मतदारसंघात मतदान केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून करण्यात आला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, किरेन रिजिजू, जितेंद्र सिंह, अर्जुनराम मेघवाल, काँग्रेसचे नेते गौरव गोगोई, कार्ती चिदंबरम, ‘द्रमुक’च्या नेत्या के. कनिमोळी, ए. राजा यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. उन्हाचा चटका वाढल्याने त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर केली असून यात ६०.०३ टक्के मतदान झाल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये ५५.२९ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी देशातील एकूण मतदानापेक्षाही कमी आहे. पूर्व विदर्भामध्ये उन्हामुळे मतदारांनी घराबाहेर पडणे टाळले. सर्वांत कमी मतदान आज बिहार राज्यात झाले. या राज्यात केवळ ४७.४९ टक्के एवढ्याच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मणिपूरमध्ये गोळीबार-


गेल्या एक वर्षापासून वांशिक हिंसाचाराचा बळी ठरलेल्या मणिपूरमध्ये आज मतदानाच्या दिवशीही हिंसाचार झाला. या राज्यातील मोरांग या विधानसभा क्षेत्रात एका बुथवर समाजकंटकांनी गोळीबार केला. यात तीन जण जखमी झाल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील कुचबिहार भागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर या केवळ एकाच मतदारसंघात आज मतदान झाले.

सायंकाळी ६ वाजेपर्यंतचे मतदान (प्रमाण टक्क्यांत)


- अंदमान निकोबार - ५७
- अरुणाचल प्रदेश - ६५
- आसाम - ७१
- बिहार - ४७
- छत्तीसगड - ६३
- जम्मू व काश्मीर - ६५
- लक्षद्वीप - ५९
- मध्यप्रदेश - ६३
- महाराष्ट्र - ५५
- मणिपूर - ६९
- मेघालय - ७०
- मिझोराम - ५४
- नागालँड - ५७
- पुदुच्चेरी - ७३
- राजस्थान - ५१
- सिक्कीम - ६८
- तमिळनाडू - ६२
- त्रिपुरा - ८०
- उत्तरप्रदेश - ५८
- उत्तराखंड - ५४
- पश्चिम बंगाल - ७८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT