rahul gandhi  sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : ''काँग्रेस सत्तेत आल्यास सॅलरी दुप्पट करणार'', राहुल गांधींनी दिलं आश्वासन

''जातीनिहाय जनगणना हा हिंदुस्थानचा एक्स-रे आहे. तेव्हाच कळेच की देशात कोणत्या वर्गाचे किती लोक आहेत. परंतु जेव्हा मी हा मुद्दा मांडला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोक विरोधात उभे राहिले. परंतु आमचं सरकार आल्यानंतर आम्ही जातीनिहाय जनगणना करु.''

संतोष कानडे

Rahul Gandhi in UP Rally : देशातल्या सर्वात जास्त लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशात आयोजित सभेमध्ये राहुल गांधींनी एक आश्वासन दिलं. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांची पगार दुप्पट करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. त्यासाठी काँग्रेसला सत्तेत पाठवा, असं आवाहन त्यांनी केलं.

युवकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, भारत सरकारकडे ३० लाख पदं रिक्त आहेत. काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही या जागा भरु आणि बेरोजगारी दूर करु. जातीनिहाय जनगणनेवरुनही राहुल गांधींनी निशाणा साधला.

राहुल पुढे म्हणाले की, जातीनिहाय जनगणना हा हिंदुस्थानचा एक्स-रे आहे. तेव्हाच कळेच की देशात कोणत्या वर्गाचे किती लोक आहेत. परंतु जेव्हा मी हा मुद्दा मांडला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोक विरोधात उभे राहिले. परंतु आमचं सरकार आल्यानंतर आम्ही जातीनिहाय जनगणना करु, त्यामुळे कुणाची किती भागिदारी आहे, हे कळेल.

मोदींना श्रीमंतांची काळजी- राहुल गांधी

केंद्रातील मोदी सरकारला फक्त गर्भश्रीमंतांचीच चिंता आहे. भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची युती आणि काही मूठभर अब्जाधीश मंडळींमुळे देशातील लोकशाही आणि राज्यघटनेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या देशातील दलित, आदिवासी आणि गरीब यांच्यासाठी राज्यघटना आणि लोकशाही या दोनच गोष्टी सर्वस्व आहेत,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

Mumbai Indians च्या संघाने नवीन प्रशिक्षक जाहीर केला; २०१० पासून संघासोबत असलेल्या खेळाडूला केले बाय बाय...

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा भाजपवर आरोप; “मतचोरीच्या मुद्द्यावरून माघार घेणार नाही”

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT