Raj Thackeray Sabha esakal
लोकसभा २०२४

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

संतोष कानडे

सिंधुदुर्गः केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. राणेंच्या प्रचारसभेसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कणकवली येथे उपस्थिती होती. यावेळी राज ठाकरेंनी मोदींच्या समर्थनामागचं कारण सांगून उद्धव ठाकरेंवर टीका केली आणि नारायण राणेंना मत देण्याचं आवाहन केलं.

राज ठाकरे म्हणाले की, आजपर्यंत महाराष्ट्राला ९ भारतरत्न मिळालेले आहेत. त्यापैकी सात भारतरत्न कोकणाच्या वाट्याला आलेले आहेत. त्यातलेही चार भारतरत्न एकट्या दापोलीमधले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ सुसंस्कृत मतदारसंघ आहे.

बदललेल्या भूमिकेबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मला एखादी गोष्ट पटली तर पटली, नाही पटली तर नाही पटली. नरेंद्र मोदींच्या अनेक गोष्टी मला तेव्हा पटल्या नव्हत्या. त्या आजही पटत नाहीत. अशा बाबतीत आपण मोकळं असणं आवश्यक आहे. ज्या पटल्या त्याचं जाहीर कौतुक करणारा मी माणूस आहे.

''३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयाचं मी कौतुक केलेलं आहे. ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. यापूर्वीच्या कितीतरी सरकारांनी आश्वासनं दिली होती. परंतु नरेंद्र मोदींच्या सरकारने ते करुन दाखवलं. आताचे काही लोक मुख्यमंत्री पद हवं होतं म्हणून विरोध करत होते. परंतु माझं वेगळं होतं. मला भूमिका पटली नव्हती म्हणून मी विरोध केला होता. समजा तुम्हाला भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर उद्धव ठाकरे आज जे बोलत आहात, ते बोलला असतात का?नक्कीच नसता बोललात.'' असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपने उद्योग गुजरातला नेले म्हणतात. मागच्या दहा वर्षातले साडेसात वर्षे उद्धव ठाकरे सत्तेत होते, त्याचवेळी ते सत्तेतून का बाहेर गेले नाहीत? स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण करायचं आणि नुकसान झालं की टीका करायची.

नारायण राणेंचं कौतुक

''नारायण राणेंनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद सांभाळले ते भल्याभल्यांनाही जमलं नव्हतं. एखादा विषय कसा समजून घ्यायचा, तो कसा सोडवायचा.. याची हातोटी राणेंकडे आहे. नुसताच बाकड्यावर जावून बसणारा खासदार पाहिजे की केंद्रामध्ये मंत्री होऊन विकास करणारा खासदार पाहिजे? असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई मेट्रो-6 ला नवे वळण, कांजूरमार्ग डेपोशिवाय होणार संचालन; देशातील पहिलाच प्रयोग, MMRDA चा ऐतिहासिक निर्णय!

Latest Marathi News Live Update : महानगर पालिका महापौर सोडती मध्ये नागपूर मनपा सर्वसाधारण महिला साठी राखीव

Man Panchayat Samiti: जयकुमार गोरेंचे विरोधकांना खुले आव्हान! माणमध्ये सर्व पक्षीयांची एकजूट; शेखर गोरेंचा स्वबळाचा नारा..

Beed News : आईने मित्रासोबत खेळायला नकार दिल्याने विद्यार्थ्याने संपविले जीवन; गेल्या वीस दिवसांतील केजमधील दुसरी घटना

Weight Loss Soup: डाएटचा सोपा फॉर्म्युला! दररोज ‘हे’ सूप प्यायल्यास वजन आपोआप होईल कमी, बनवण्याची पद्धत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT