Lok Sabha Elections esakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Elections: किस्से निवडणुकीचे! शालिनीताईंनी यशवंतरावांना घाम फोडला होता...

Lok Sabha Elections: आणीबाणीनंतर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी 'रेड्डी काँग्रेस'ची स्थापना केली. १९७८ मध्ये वसंतदादा या पक्षाचे मुख्यमंत्री बनले.

Sandip Kapde

Lok Sabha Elections: देशात आणीबाणीनंतर झालेली लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली. संपूर्ण देशाचं लक्ष होत ते सातारा लोकसभा मतदारसंघावर...वसंतदादा पाटील यांच्या पत्नीने यशवंतराव चव्हान यांना घाम फोडला होता.

1980 च्या लोकसभा निवडणुकीचा किस्सा आहे. सरकार पाडल्याचा रागात वसंतदादांनी हा गेम प्लॅन आखला होता, फक्त शरद पवार सरकार पाडू शकत नाही यात यशवंतरावांची देखील बुद्धी होती असा समज वसंतदादांचा होता...

आणीबाणीनंतर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी 'रेड्डी काँग्रेस'ची स्थापना केली. १९७८ मध्ये वसंतदादा या पक्षाचे मुख्यमंत्री बनले. पण दरम्यान शरद पवारांच बंड घडलं आणि त्यांनी दादांचे सरकार पाडून मुख्यमंत्रीपद स्वतःच्या हाती घेतलं. वसंतदादा या घटनेनंतर नाराज झाले.  

सप्टेंबर १९७९ मध्ये त्यांनी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र यशवंतराव रेड्डी काँग्रेसमध्ये होते. पुढे जेव्हा 1980 मध्ये लोकसभा निवडणुका आल्या तेव्हा इंदिरा काँग्रेसने सांगलीतून वसंतदादांना तर साताऱ्यातून त्यांच्या पत्नी शालिनी ताईंना मैदानात उतरवलं.

साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण विरूद्ध शालिनीताई या लढतीने देशाचे लक्ष वेधले. खुद्द वसंतदादांनी या मतदारसंघात जोरदार प्रचार केला. या निवडणुकीत शालिनीताईंनी यशवंतरावांना घाम फोडला. शालीनीताईंना १ लाख ७० हजार १८० मते मिळाली होती. तर यशवंतरावांना २ लाख २३ हजार २३१ मते मिळाली होती.

यशवंतराव जिंकले पण महाराष्ट्राच्या राजकारणाचे अनभिषिक्त सम्राट म्हणवणाऱ्या या दिग्गज नेत्याला घरच्या मैदानात विजयासाठी कसरत करावी लागली ती वसंतदादा पाटलांमुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT