Loksabha Election 2024 esakal
लोकसभा २०२४

Loksabha election 2024 : आतापर्यंत ३५ जणांची खासदारकी बिनविरोध; 'यांचा' आहे समावेश

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्लीः सुरतमध्ये झालेल्या बिनविरोध निवडणुकीत विजयी झालेले मुकेश दलाल यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे खाते उघडले आहे. कॉँग्रेससह विरोधी पक्षांनी या बिनविरोध निवडणुकीवरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मात्र, ही बिनविरोध निवडीची परंपरा पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून चालत आली असून देशात १९५१ पासून आतापर्यंत असे ३४ जण बिनविरोध निवडून आले होते. त्यात यशवंतराव चव्हाण यांचाही समावेश आहे.

सुरत लोकसभा मतदार संघात भाजपवगळता अन्य सर्व उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. कॉँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज प्रस्तावकांच्या स्वाक्षरींमधील तफावतीमुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला आधीच फेटाळला होता.

मुकेश दलाल यांच्या आधी मागील सात दशकांमध्ये १९५१ पासून अशाच प्रकारे ३४ जणांची बिनविरोध निवड झाली आहे. अलिकडच्या काळात म्हणजे २०१२ ला समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी कन्नौज लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध जिंकली होती.

अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्नी डिंपल यादव यांना बिनविरोध खासदारकीची संधी मिळाली होती. त्याआधी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले यशवंतराव चव्हाण हे देखील लोकसभेवर नाशिकमधून बिनविरोध निवडून गेले होते. यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला, हरेकृष्णा महताब, टी.टी.कृष्णमाचारी, पी.एम.सईद आणि एस.सी.जमीर हे देखील बिनविरोध निवडून येऊन खासदार झाले होते.

१९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त सात उमेदवार बिनविरोध जिंकले. त्याआधी १९५१ च्या आणि त्यानंतर १९६७ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येकी पाच उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला होता. १९६२ मध्ये तीन आणि १९७७ मध्ये दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते, तर १९७१, १९८० आणि १९८९ मध्ये प्रत्येकी एक उमेदवार अशाच पद्धतीने निवडणूक जिंकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT