Washim_Yavatmal 
लोकसभा २०२४

Yavatmal Polling Booth: जेवणासाठी ठेवलं मतदान केंद्र बंद! यवतमाळमध्ये नेमकं काय घडलं?

संबंधित निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाईची शक्यता

Amit Ujagare (अमित उजागरे)

हिवरी : जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. लोक कामातून वेळातवेळ काढून मतदान केंद्रांवर दाखल होत असतात. त्यामुळं मतदानाच्यादिवशी वेळ संपेपर्यंत मतदान केंद्र बंद ठेवता येत नाहीत.

पण तरीही यवतमाळमध्ये दुपारच्या जेवणासाठी मतदान केंद्र बंद ठेवण्यात आल्याचा अजब प्रकार घडला आहे. यामुळं आता संबंधित निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. (Yavatmal Polling Booth closed for lunch for polling officials)

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील यवतमाळच्या हिवारी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. या ठिकाणी दुपारच्या जेवणासाठी तब्बल २५ मिनिटं मतदान केंद्र बंद ठेवण्यात आलं होतं. (Latest Marathi News)

मतदान केंद्राला कड्या लावून आतमध्ये निवडणुकीच्या ड्युटीवर असलेले कर्मचारी जेवण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी मतदानासाठी आलेले मतदार केंद्राबाहेर बसलेलेही दिसून आले आहेत. (Marathi Tajya Batmya)

एकतर मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत घेऊन यावं लागतं असताना दुसरीकडं आलेल्या मतदारांना ताटकळत ठेवल्याचा हा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकारामुळं निवडणूक आयोग इथल्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT