Manoj Jarange-Patil esakal
लोकसभा २०२४

Manoj Jarange-Patil: लोकसभेत कुणालाही पाठिंबा नाही, ज्यांना पाडायचं त्यांना पाडा; मनोज जरांगेंनी स्पष्ट सांगितलं

Manoj Jarange-Patil: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाज निवडणुकीत उमेदवार देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

Sandip Kapde

Manoj Jarange-Patil

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लोकसभेत कुठेही अपक्ष उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत कुणालाही पाठींबा नाही ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, असं देखील जरांगेंनी स्पष्ट केले. 

कुठेही प्रचाराला जाणार नाही, लोकांचं उलट आहे आपलं उलट आहे. लोक मतं मागायला जातात पण आपल्याडे आधी मतं आहेत. मराठ्यांची परिस्थिती आता पहिल्यासारखी राहिली नाही. कोणताही उमेदवारी देणार नाही, पाठिंबा देणार नाही. आता मराठा समाजाने निर्णय घ्यावा, असे मनोज जरांगे म्हणाले.

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, वसंत मोरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यामुळे मनोज जरांगेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे नवीन आघाडी करणार अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता जरांगे राजकारणापासून दूर राहणार हे स्पष्ट झालं आहे.

मराठा समाजाने निवडणुकीत पडण्याची गरज नाही. गावागावातून आलेल्या अहवालातून अपक्ष उमेदवार देता येणार नाही. मात्र तुम्हाला ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा, असे आवाहन जरांगे यांनी केले.

मनोज जरांगे म्हणाले, मी खूप साधारण माणूस आहे. मला राजकारण कळत नाही. मी राजकारणात असलो काय नसलो काय माझ्यात आरक्षण मिळवून देण्याचा दम आहे. लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार नाही. जो सगेसोयरे कायद्याला विरोध करेल त्याला पाडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT