Sharad Pawar NCP Shashikant Shinde esakal
लोकसभा २०२४

'दोन्ही राजे समोर असले, तरी साताऱ्याची जनता माझ्यासोबतच'; पवारांनी टाकला विश्वास अन् शिंदेंनी दिलं खुलं आव्हान

सातारा हा शरद पवारांच्या (Sharad Pawar) विचारांचा जिल्हा आहे.

सकाळ डिजिटल टीम

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवार यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली.

सातारा : श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण, या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला. पक्षासाठी संघर्षाच्या कालावधीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अखेरीस आपला निष्ठावान शिलेदार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना बालेकिल्ल्याच्या मैदानात उरवले आहे.

दरम्यान, उमेदवारी (Satara Lok Sabha) जाहीर झाल्यानंतर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सातारा हा शरद पवारांच्या (Sharad Pawar) विचारांचा जिल्हा आहे. दोन्ही राजे समोर असले, तरी साताऱ्याची जनता माझ्यासोबत आहे. सातारा मतदारसंघातील जनता राष्ट्रवादीलाच विजयी करेल, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवार यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केला.

शिंदे म्हणाले, ‘‘सातारा लोकसभेची उमेदवारी देऊन गुरूने पुन्हा एकदा शिष्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांनी मला पाच वेळा आमदार केले. मंत्री केले आणि आता साताऱ्यामधून लोकसभेची उमेदवारी दिली. हा निष्ठावान कार्यकर्त्यांचा विजय आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ही लढाई असणार आहे. दोन्ही राजेसमोर असले, तरी माझ्याबरोबर साताऱ्याची जनता माझ्यासोबत आहे. सातारा लोकसभेत राष्ट्रवादीचा, शरद पवारांच्या विचारांचा नक्कीच विजय होणार आहे.’’

माथाडी मलाच साथ देतील!

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या भूमिकेबाबत विचारल्यावर शिंदे म्हणाले, ‘‘ते भाजपत असले, तरी माथाडी कामगार विश्वास ठेऊन मला दिल्लीत पाठवतील. साताऱ्याच्या जनतेला माहीत आहे. सभागृहात आवाज उठवून साताऱ्यासाठी कोण प्रकल्प घेऊन येणार, त्यामुळे माझा विजय पक्का आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT