Dhairyasheel Mane, Shrikant Shinde, Shrirang Barne 
लोकसभा २०२४

Modi Cabinet: श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, धर्यशील मानेंना केंद्रात मंत्रीपदं मिळणार - सूत्र

लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर एनडीएकडून लवकरच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर एनडीएकडून लवकरच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. पण तत्पूर्वीच मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील कोणाला संधी मिळेल याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेनुसार, शिंदेंच्या शिवसेनेला तीन मंत्रीपदं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. (Modi Cabinet Srikant Shinde Srirang Barane Dharyasheel Mane likely to get ministerial posts at union govt )

महाराष्ट्रात शिंदेंच्या शिवसेनेला ७ जागा मिळाल्या आहेत. एनडीएत भाजप (२४०) तेलगू देसम पार्टी (१६), जनता दल युनायटेड (१२) या दोन पक्षांनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला (७) जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं शिवसेनेला तीन मंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींची आज एनडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तसेच येत्या ७ जून रोजी एनडीएच्या नेत्यांसह मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेणार आहेत. यावेळी ते सत्तास्थापनेचा दावा करतील. त्यानंतर त्यांना संसदेत बहुमत सिद्ध करावं लागेल.

तसंच दुसरीकडं इंडिया आघाडीच्या नेत्यांची देखील आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर इंडियाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, "जनतेनं फॅसिस्ट सरकारच्या विरोधात कौल दिला आहे. लोकांची इच्छा आहे की हे सरकार जावं, योग्य वेळ आल्यावर आम्ही योग्य ती पावलं उचलू" तसंच त्यांनी समविचारी पक्षांना आणि अपक्ष खासदारांना एकत्र येण्याचं आवाहनही केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT