Pune Loksabha Constituency sakal
लोकसभा २०२४

Pune Loksabha Constituency : एका दिवशी दोन हायव्होल्टेज सभा ; मोदी, पवार अन् ठाकरे सोमवारी पुण्याच्या मैदानात

प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभा एकाच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. २९) सायंकाळी पुण्यात होणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभा एकाच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. २९) सायंकाळी पुण्यात होणार आहेत. शहरात एकाच दिवशी मोठ्या नेत्यांच्या सभा होण्याचा योगायोग पहिल्यांदाच आला आहे. त्यांच्या तोफा कशा धडाडणार? याकडे पुणेकरांचे लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे; तर चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यात अनुक्रमे बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघांचा समावेश आहे. महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा वारजे येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे. त्यानंतर दोनच तासांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी यांची टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी सात वाजता सभा होईल. मोदी, पवार आणि ठाकरे एकाच दिवशी दोन ठिकाणांवरून शहरात मतदारांना साद घालणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘सुळे यांच्या प्रचारासाठी पवार व ठाकरे यांची सभा शहरात होणार होतीच. दोन्ही नेत्यांच्या सभेसाठी २९ एप्रिलचा दिवस निश्चित झाला आहे. त्यानुसार सभेचे नियोजन सुरू आहे. सभा सायंकाळी पाच वाजता होईल. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.’’

सभेपूर्वी मोदींचा रोड शो

सभेपूर्वी मोदी यांचा पुण्यात रोड शो होणार असून, कार्यकर्त्यांना तयारीची सूचना दिली आहे. लातूर येथील सभा संपल्यानंतर मोदी पुण्यात येणार आहेत. विमानतळावरून सभास्थळी जाताना जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौकापासून ते डेक्कन, टिळक चौक, टिळक रस्ता, स. प. महाविद्यालयदरम्यान रोड शो होईल. रोड शो बंद गाडीऐवजी उघड्या जीपमधून होण्याची शक्यता आहे; पण अद्याप त्यास भाजपमधील सूत्रांकडून दुजोरा दिलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! या 10 मागण्या मान्य झाल्यास पगारात आणि पेन्शनमध्ये होणार बंपर वाढ

भररस्त्यात वाघाला घेरलं, नंतर जवळ जाऊन...; ताडोबातील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल

काळजाला भिडणारी घटना! ज्या वडिलांनी हात धरून चालायला शिकवलं, त्यांनाच पोत्यात भरून पार्सल करण्याचा मुलीचा प्रयत्न; पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Pune Zp Election : पुणे जिल्हा परिषदेत आंबेगावला पुन्हा मान; वळसे पाटील कुटुंबाची परंपरा कायम, उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा विवेक वळसे पाटील

SCROLL FOR NEXT