Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : ओडिशात वाजणार प्रचाराची सुरेल धून ; लोकसभा निवडणुकीसाठी संगीतकारांना पक्षांकडून मागणी

ओडिशात सत्ताधारी बिजू जनता दल (बीजेडी) पक्षासह अन्य पक्षांचे नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ लागले आहेत. मतदारांना आकर्षून घेण्यासाठी यंदा संगीतमय प्रचारावर बहुतेकांचा भर आहे.

सकाळ वृत्तसेवा

भुवनेश्‍वर : ओडिशात सत्ताधारी बिजू जनता दल (बीजेडी) पक्षासह अन्य पक्षांचे नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ लागले आहेत. मतदारांना आकर्षून घेण्यासाठी यंदा संगीतमय प्रचारावर बहुतेकांचा भर आहे. त्यामुळे राज्यातील प्रादेशिक संगीताची धून सर्वत्र वाजणार आहे. संगीतकार, गीतकार, गायक आणि ध्वनिमुद्रण स्टुडिओमध्ये प्रचाराची गाणी, जिंगल्स आणि अल्बम तयार करण्याची धामधूम सुरू आहे. संगीत क्षेत्रासाठी निवडणूक ही व्यवसायासाठी एक महत्त्वपूर्ण संधी बनत आहे.

ओडिशात लहान आणि मोठे असे १०० हून अधिक म्युझिक स्टुडिओ आहेत. बहुतांश स्टुडिओ हे कटक आणि भुवनेश्वरमध्ये आहेत. काँग्रेस आणि भाजपने उमेदवार जाहीर केल्यामुळे, बहुतांश स्टुडिओत प्रचारगीतांवर काम सुरू झाले आहे. ‘बीजेडी’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वीच ज्यांना तिकीट मिळण्याचा विश्वास होता, त्यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी यादी घोषणा होण्यापूर्वीच प्रचारगीतांसाठी संगीत दिग्दर्शकांशी संपर्क साधला होता, अशी माहिती या क्षेत्रातील सूत्रांनी दिली.

प्रख्यात संगीतकार प्रेम आनंद यांनी यावेळी भाजपसाठी ‘फिर आएगा मोदी’ हे व्हिडिओ गीत तयार केले आहे. आनंद यांना सध्या तीन प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून मागणी आहे. ‘‘निवडणूक प्रचारात नेत्यांच्या लांबलचक भाषणापेक्षा संगीत मतदारांना आकर्षून घेते. त्यामुळे निवडणूक संपेपर्यंत आकर्षक प्रचारगीतांना मागणी जास्त असते. उमेदवार आम्हाला संकल्पना सांगतात. खर्च करण्याच्या त्यांच्या तयारीनुसार एकतर नवीन संगीत तयार केले जाते किंवा राजकीय मुद्दे जुन्या लोकप्रिय गाण्यात गुंफून गाणी तयार केली जातात,’’ असे प्रेम आनंद यांनी सांगितले. केवळ लोकप्रिय उडिया गाण्यांनाच नाही तर इतर बोली भाषांतील गाजलेल्या गाण्यांनाही निवडणूक प्रचारासाठी खूप मागणी आहे. उमेदवारांकडून गाणी आणि ध्वनिमुद्रित केलेली भाषणे यांचा सतत मागणी असल्याने निवडणुका संपेपर्यंत रेकॉर्डिंग सुरूच राहील, असे संगीतकारांनी सांगितले.

कमाईसाठी सुगीचा हंगाम

चित्रपटातील नेहमीच्या गाण्यांपेक्षा अशा गाण्यांसाठी पैसा जास्त मिळत असल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्यांना निवडणूक म्हणजे सुगीचा काळ असतो. राजकारण्यांची भाषणे रेकॉर्ड करण्याबरोबरच काही जिंगल्ससह एक किंवा दोन गाणी लिहिण्यासाठी आणि संगीत देण्यासाठी किमान एक लोकप्रिय संगीतकार एक लाख रुपये कमावतो.

फारसे लोकप्रिय नसलेले संगीतकार आणि संगीताची जाण असलेल्यांना या काळात एका गाण्यासाठी अडीच हजार ते तीन हजार रुपये मिळतात.सध्या अशी प्रचारगीते रचण्याचे काम सुरू असून पुढील आठवड्यात उमेदवारांचे आवाज ध्वनिमुद्रित केले जातील.

- प्रेम आनंद, प्रसिद्ध संगीतकार, ओडिशा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT